मुंबई: आजपासून अदानी समुहाकडून गुजरातमधील अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी व अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फोर बी लिमिटेड या दोन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू होणार आहे. गुजरात मधील खवडा येथील प्रकल्पाचा लवकरच श्रीगणेशा होत कामकाज प्रकियेत येणार असल्याचे कंपनीने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये मी म्हटले आहे.
या एजीसीएल (अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड) चा १००० मेगावॉट वीज प्रकल्प खावडा गुजरात येथे सुरू होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या प्रकल्पाची ऊर्जा निर्मितीची एकूण क्षमता ९४७८ मेगावॉट इतकी असणार आहे. २०३० पर्यंत प्रकल्पात ४५ गिगावॉट निर्मितीचे लक्ष अदानी समुहाकडून ठेवण्यात आले आहे. आवश्यक त्या प्रक्रिया परवाने व कायद्यांची पूर्तता करत हा प्रकल्प ५ मार्च २०२४ पासून सुरु झाला आहे. गेल्या जानेवारीत अदानी ग्रीन एनर्जीकडून ९३५० कोटी रुपये उभारण्यासाठी भागभांडवलधारकांची परवानगी घेण्यात आली होती.
डिसेंबर २३ मध्ये अदानी ग्रीन कंपनीचा निव्वळ नफा २५६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. आर्थिक वर्ष २३ मध्ये हा १४८.५ कोटी इतका राहिला आहे. अदानी समुहाकडून हा जगातील सर्वाधिक क्षमतेचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प असल्याचे मागील महिन्यात सांगण्यात आले होते.
माध्यमात याविषयी प्रतिक्रिया देताना अदानी ग्रीन एनर्जीचे अमित सिंह म्हणाले, “ नुकत्याच जाहीर केलेल्या इक्विटी आणि कर्ज भांडवलाच्या वाढीसह, आम्ही २०३० पर्यंत लक्ष्यित ४५ GW क्षमतेच्या चांगल्या सुरक्षित वाढीच्या मार्गासाठी भांडवली व्यवस्थापन फ्रेमवर्क तयार केले आहे. आम्ही एक लवचिक पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करून आमची अंमलबजावणी क्षमता वाढवत आहोत. स्थानिकीकरण, मोठ्या प्रमाणावर डिजिटलायझेशन, कार्यबल विस्तार आणि सक्षमता निर्माण यावर जोर देऊन आम्ही गुजरातमधील खवडा येथे जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पावर काम करत आहोत आणि 2030 पर्यंत अक्षय ऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचे लक्ष्य जगाने स्विकारले असताना अक्षय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी नवीन मानके स्थापित करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.