"कॉंग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का नाही?", 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा थक्क करणारा ट्रेलर

    05-Mar-2024
Total Views | 290
रणदीप हुड्डा याचा बहुचर्चित स्वातंत्र्यवीर सावरकर हा आणखी एक चरित्रपट २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा थक्क करणारा ट्रेलर भेटीला आला आहे.
 
 

veer savarkar 
 
मुंबई : “आजपर्यंत कॉंग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही?”, असा थेट प्रश्न विचारणाऱ्या वीर सावरकर (SwatantraVeerSavarkar) यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (SwatantraVeerSavarkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला असून केवळ ताही तासांतच या ट्रेलर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या चरित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची व्यक्तिरेखा साकारत असून एका त्याच्यातील कलेचा आणखी एक नवा पैलु प्रेक्षकांचा पाहण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.
 
 
‘स्वातंत्र्यवीर सावरकर' (SwatantraVeerSavarkar) या चरित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सावरकरांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्याचा तो कठिण काळ दाखवण्यात आला आहे. सावरकरांचा उल्लेख करताना इंग्रज भारतातील सर्वात खतरनाक व्यक्ती म्हणत त्यांना संबोधत असून पुढे सावरकरांनी साथीदारां सोबत विदेशी मालाची होळी कशी केली हे देखील पाहता येत आहे. तसेच, परदेशात सावरकर-गांधींची झालेली भेट, परदेशात जाऊन सावरकरांनी भारतात पुरवलेली शस्त्र, जहाजातून मारलेली उडी, स्वातंत्र्यलढ्यासाठी केलेले संबोधन आणि अखंड भारत ही विचारधारा देतानाचे निडर सावरकर देखील ट्रेलरमध्ये दिसत आहेत.
 
चित्रपटाच्या ट्रेलरमधूनच सावरकरांबद्दल न माहित असणाऱ्या गोष्टी आणि त्यांचा आजवर इतिहास जो मोठ्या पडद्यावर उलगडला नाही तो प्रेक्षकांसमोर मांडण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि निर्माता रणदीप हुड्डा याने उचलले आहे. तसेच, या चित्रपटात अभिनेत्री अंकिता लोखंडे वीर सावरकरांच्या पत्नीची यमुनाबाईंची भूमिका साकारत आहे. हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार स्वातंत्र्यवीर सावरकर हा चरित्रपट २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या स्वाधीन होणार आहे.
 
 
मराठीत हा चित्रपट अधिक सुंदर वाटला
 
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. यावर आपले मनोगत व्यक्त करताना रणदीप म्हणाला, “मी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट ज्यावेळी मराठी भाषेत पाहिला त्यावेळी मला अधिक सुंदर वाटला. सध्या जरी हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होत असला तरी जगभरातील प्रत्येक भाषेत हा चित्रपट व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण देश विदेशात वीर सावरकरांचा इतिहास त्यांची कथा पोहोचली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे”, असे देखील रणदीप याने म्हटले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121