लोकसभेनंतर राष्ट्रवादी पुन्हा पवारांकडे?, रोहित पवारांचे दिवास्वप्न...
रोहित पवारांचा दावा
05-Mar-2024
Total Views | 72
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादांकडील काहीजण परत शरद पवारांकडे येतील, असा दावा शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मंगळवारी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्यं केलं आहे.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "लोकसभा निवडणुक संपल्यानंतर २० ते २३ आमदार परत एकदा शरद पवारांकडे येतील. आतासुद्धा बऱ्यापैकी काही आमदार शरद पवार साहेबांचा फोटो लावतात. यापुढे हा आकडा वाढतच जाणार आहे," असा दावा त्यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, "अजितदादांच्या पक्षातील एक नेता अशा काही आमदारांना गोळा करतोय जे म्हणतात की, आम्हाला भाजपच्या चिन्हावर लढायचं आहे. तो आकडा ११ ते १२ च्या आसपास गेला आहे. त्यामुळे ते म्हणणार की, आम्ही भाजपच्या चिन्हावर लढू आणि बाकीचे २२, २३ आमदार म्हणतील की, साहेबांकडे परत जाऊ. त्यामुळे त्या पक्षात कोण राहतात हे बघावं लागणार आहे," असेही ते म्हणाले आहेत.
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिलीच लोकसभा निवडणुक आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणता गट बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.