निलेश लंके का नाराज?, खासदाराच्या वक्तव्याने चर्चांना उधाण!

    05-Mar-2024
Total Views |
MLA NIlesh Lanke

महाराष्ट्र : 
 आमदार निलेश लंके यांना शरद पवार गटात येण्याची ऑफर खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. खा. कोल्हेंच्या ऑफरमुळे आ. निलेश लंके नाराज असल्याची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, अजित पवार गट आणि शरद पवार गटात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीकास्त्र सुरू असल्याचे दिसत आहे. यातच आता खा. कोल्हेंच्या वक्तव्यामुळे यात आणखीनच रंगत आली असून आ. निलेश लंके नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अमोल कोल्हे यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. त्यामुळेच अमोल कोल्हेंच्या वक्तव्याने राजकीय मैदानात चर्चा सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे अमोल कोल्हेंनी अजित पवार गटातील लोकांना आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

अहमदनगर येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. चार दिवस चाललेल्या महानाट्याच्या समारोप कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी आ. निलेश लंके यांना शरद पवारांसोबत येण्याचं ऑफर दिलीय. तसेच, लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घेत राज्याच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजवलीच पाहिजे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.