लव्ह जिहाद! नौफिल, इम्रान, उस्मानने केले १७ वर्षीय मुलीचे अपहरण

    05-Mar-2024
Total Views | 52
 LOVE JIHAD
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. येथे नौफिल, इम्रान, उस्मान, समीर खान आणि त्यांच्या टोळीने एका १७ वर्षीय हिंदू मुलीचे तिच्या घरासमोरून अपहरण केले. कुटुंबीयांचा आरोप आहे की नौफिल खानने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे ब्रेनवॉश केले आणि नंतर तिचे अपहरण केले.
 
मुलीच्या वडिलांचा आरोप आहे की, त्यांची मुलगी ४.३२ लाख रुपये घेऊन घरातून निघून गेली होती, तेव्हा कारमध्ये आलेल्या नौफिलच्या मित्रांनी घराबाहेरून तिचे अपहरण केले. संपूर्ण प्रकरण कौशांबी जिल्ह्यातील पिपरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. जिथे शनिवारी, दि. २ मार्च २०२४ संध्याकाळी एका १७ वर्षीय मुलीचे तिच्या घरासमोरून अपहरण करण्यात आले. मुलीच्या कुटुंबीयांनी नौफिल खान, त्याची आई आणि वडील तालिब खान तसेच समीर खान, इमरान उर्फ इनू, उस्मान आणि नौफिलच्या मित्रांच्या नावावर एफआयआर दाखल केला आहे.
 
 
अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करून लग्न केले असावे, अशी भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पैसे मिळाल्यानंतर मुलीची हत्या होऊ शकते, अशी भीतीही त्यांना आहे. एफआयआरनुसार, एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तरुण तालिब जमीर आणि त्याचे साथीदार इम्रान, सलीम, उस्मान, अजित आणि त्यांच्या साथीदारांनी धर्मांतर करून तिच्याशी लग्न करण्याच्या उद्देशाने धमकावले आणि तिचे अपहरण केले.
 
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत मी हिंदू धर्माचा असून आरोपी मुस्लिम असल्याचा आरोप स्पष्टपणे करण्यात आला आहे. त्यांनी पूर्ण नियोजन करून रात्री प्रवासी गाडीतून माझ्या मुलीचे अपहरण केले. या काळात माझ्या मुलीनेही घरातून ४.३२ लाख रुपये काढून घेतले. ही टोळी माझ्या मुलीचीही हत्या करू शकते, अशी भीती वाटते. दरम्यान, एएसपी अशोक कुमार वर्मा यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आणि मुलीला लवकरात लवकर परत मिळवून दिले जाईल, असे सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121