"ब्राइड ऑफ तमिळनाडू!" (तमिळनाडूची वधू) हिंदूविरोधी स्टॅलिनचे कार्यकर्ते हे काय करुन बसले?

    05-Mar-2024
Total Views | 1079
 TamilNadu CM
 
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या समर्थकांनी लावलेला पोस्टर्समुळे त्यांचीच फजिती झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी एमके स्टॅलिन यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावले होते. पण त्यांनी या पोस्टरमध्ये मोठी चूक केली. त्यामुळे सोशल मिडियावर त्यांच्या पक्षाला ट्रोल केले जात आहे.
 
वास्तविक, समर्थकांना स्टॅलिनला तामिळनाडूची शान म्हणायचे होते, पण चुकून त्यांनी स्टॅलिनला तामिळनाडूची वधू म्हणणारे पोस्टर लावले. या पोस्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एमके स्टॅलिनच्या पोस्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये स्टॅलिन यांचे वर्णन ‘तामिळनाडूची वधू’ असे करण्यात आले आहे.
 
 
समर्थकांना स्टॅलिनचे वर्णन ‘प्राइड ऑफ तामिळनाडू’ असे करायचे असले तरी पोस्टरवर प्राइडऐवजी ब्राइड हा शब्द छापण्यात आला होता. या चुकीकडे लक्ष न देता स्टॅलिन यांच्या समर्थकांनी तामिळनाडूची राजधानी चेन्नईत रस्त्याच्या कडेला पोस्टर लावले. लोकांचे लक्ष पोस्टरवर पडताच तो चर्चेचा विषय बनला.
 
पोस्टरचा विषय चर्चेत येण्याच्या आधी दि. ४ फेब्रुवारी २०२४ सोमवारी एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन चर्चेत आले होते. सनातन धर्माविरोधात असभ्य आणि वादग्रस्त भाषण करण्यावरुन त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. पोस्टरची चूक एमके स्टॅलिन यांच्या पक्षाने केली आहे. पण, काही दिवसांपूर्वी तामिळनाडू सरकारने एका शासकीय जाहिरातीमध्ये मोठी चूक केली होती.
 
तामिळनाडूतील स्टॅलिन सरकारने वृत्तपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीत इस्रोने बनवलेल्या रॉकेटच्या जागी चीनच्या रॉकेटचा फोटो लावला होता. स्टॅलिन सरकारच्या या चूकीनंतर देशभरातून त्यांच्यावर टीका झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा स्टॅलिन सरकारला इस्रोची माफी मागण्यास सांगितले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचार कायम!धर्मांधांनी हिंदूंच्याच दुकानांना केले लक्ष्य; अहिंदूंची दुकाने शाबूत, तर काहींनी भितीपोटी मालदात केले स्थलांतर

मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचार कायम!धर्मांधांनी हिंदूंच्याच दुकानांना केले लक्ष्य; अहिंदूंची दुकाने शाबूत, तर काहींनी भितीपोटी मालदात केले स्थलांतर

Waqf Amendment Act पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायदा संसदेत पारित केल्यानंतर धर्मांधांनी हिंदूंवर, त्यांच्या घरांवर आणि दुकानांना टार्गेट करताना दिसले आहेत. मात्र, मुस्लिमांच्या दुकानांना काहीच झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर इस्लामी कट्टरपंथीयांनी पेट्रोल आणि बॉम्बने हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले. अशातच आता मुर्शिदाबादमधून काही हिंदूंनी परिस्थिती पाहता पळ काढला आहे. अशातच संबंधित परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता बॅनर्जी सरकार अपयशी ठरल्याच्या टीका विरोधकांकडून ..

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा साठा केला जप्त

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा साठा केला जप्त

Drugs Smuggler भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ज्यात त्यांना मोठे यश संपादन करता आले आहे, १२-१३ एप्रिलच्या रात्री भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाईमध्ये समुद्रातून तस्करी करत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, ज्याची किंमत सुमारे १८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे औषध मेथाम्फोटामाइन असण्याची शक्यता असून यासंदर्भात अजूनही चौकशी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121