“हिंदुत्व ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारधारा आजही....”,

    04-Mar-2024
Total Views |
वीर सावरकर यांची न ऐकलेली आणि पाहिलेली गाथा मोठ्या पडद्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर या चरित्रपटाच्या निमित्ताने झळकणार आहे.
 

veer savarkar 

मुंबई : "हिंदुत्व ही वीर सावरकरांची विचारधारा आज प्रत्येक भारतीयांच्या मनात घट्ट रुजल आहे, आणि याच कारणामुळे आजही स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचे विचार आणि सावरकर काळाशी एकरुप वाटतात", असे मत रणदीप हुड्डा याने मांडले. नुकताच रणदीप हुड्डा (Randeep Hooda) दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा मुंबईत संपन्न झाला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दुरदृष्टी म्हणजे आजचा संघटित भारत आहे असे रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने म्हणत सावरकर आजच्या काळाची एकरुप असण्याची महत्वपुर्ण कारणे देखील त्याने सांगितली.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर आजच्या काळातील विचारांशी एकरुप का वाटतात असा प्रश्न विचारला असता रणदीप म्हणाला, “वीर सावरकर आजच्या काळाशी एकरुप आहेत कारण सावरकरांनी एक सुसंस्कृत भारत, संस्कृतीशी एकनिष्ट होणारा भारत आणि अखंड भारत पाहिला. आजचा आपला भारत देश या सर्व गोष्टींना पुरक ठरणारा आहे. तसेच, भारताने लष्करीदृष्ट्या सशक्त राहिले पाहिजे ही सावरकरांनी पाहिलेली दुरदृष्टी होती. आणि आज वर्तमानकाळात आपली लष्कराची बाजू भरभक्कम आहे. याशिवाय हिंदुत्व ही त्यांची विचारधारा आज प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजली आहे. याशिवाय भारतांने संघटित राहावे हा सावरकरांचा अटट्हास आणि स्वप्न आजचा भारत परिपुर्ण करत आहे. आणि याच कारणांमुळे आजही वीर सावरकर यांचे विचार काळाशी एकरुप ठरतात”, असे ठाम उत्तर रणदीपने दिले.
 
'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चरित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन, निर्मिती आणि अभिनय अशा चारही महत्वपुर्ण भूमिका रणदीप हुड्डा याने निभावल्या आहेत. २२ मार्च रोजी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपुर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त रणदीप हुड्डा याने सेल्युलर जेलला भेट देत जिथे सावरकरांना दोनदा जन्मठेप दिली होती त्या सेलमध्ये जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्याने असे देखील म्हटले होते की, "जिथे मी २० मिनिटं देखील राहू शकलो नाही तिथे सावरकरांनी दोन जन्मठेपांचा खडतर काळ कसा काढला असेल याचा विचार देखील भयभीत करणारा वाटतो".
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.