'ओएनजीसी लिमिटेड'मध्ये भरती सुरू; १.८ लाखापर्यंत पगार, जाणून घ्या कसा कराल अर्ज

    04-Mar-2024
Total Views | 50
ONGC Recruitment 2024

मुंबई : 
'ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन(ओएनजीसी) लिमिटेड'अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. ओएनजीसी लिमिटेडकडून नवीन भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ओएनजीसी लिमिटेडमधील रिक्त जागांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी २९ फेब्रुवारी २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ओएनजीसी लिमिटेड मधील पदभरतीसंदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊयात.

पदाचे नाव -

भूभौतिकशास्त्रज्ञ (०३ जागा)
सहाय्यक कार्यकारी अभियंता (२२ जागा)
(एकूण २५ जागा)


शैक्षणिक पात्रता -

पदांच्या आवश्यकतेनुसार संबंधित विषयातील पदवीधर
 

वेतनमान -

६०,००० ते १,८०,००० रुपये.
 

वयोमर्यादा -

२८ ते ४५ वर्षे

 
नोंदणी शुल्क -

जनरल, ओबीसी उमेदवारांकरिता १ हजार रुपये
एससी, एसटी उमेदवारांना शुल्कात सूट


इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असेल. 

 
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०६ मार्च २०२४ असेल.


ओएनजीसी अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा

अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..