भारतातून कोळ्यांच्या चार नव्या प्रजातींचा शोध

महाराष्ट्रातील दोन तर तमिळनाडूतील दोन प्रजातींचा समावेश

    30-Mar-2024   
Total Views |
भारतातुन चार नव्या जम्पिंग स्पायडरच्या (jumping spider) प्रजातींचा शोध लावण्यात आला असून या विषयीचा संशोधन अहवाल प्रकाशित. 


Jumping spiders


मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतातील महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन राज्यांमधून चार नव्या जम्पिंग स्पायडरच्या (jumping spider) प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातील धाराशिव आणि सोलापूर तर, तमिळनाडूतील कोइंबतुर आणि विल्लुपुरम या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असून या विषयीचा संशोधन अहवाल (jumping spider) ‘युरोपियन जर्नल ऑफ टॅक्सोनोमी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.


पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण भूमिका बजावणारे कोळी संशोधन आणि अभ्यासाच्या दृष्टीकोनातून, मात्र नेहमी मागे पडत राहिले. अशातच भारतामधून एकाचवेळी चार नव्या प्रजातीच्या (jumping spider) संशोधन अहवाल प्रकाशित झाला ही एक सकारात्मक बाजू आहे. महाराष्ट्रातील धाराशिव, सोलापूर आणि तमिळनाडूतील कोइंबतुर आणि विल्लुपुरम या चारही जिल्ह्यांमधून जम्पिंग स्पायडरच्या (jumping spider) प्रत्येकी एक प्रजातीचा नव्याने शोध लावण्यात आला आहे.


spider researchers


या संशोधनामध्ये ऋषिकेश त्रिपाठी, निखिल कुणी, गौतम कदम, कीर्थना कुमारनं आणि अंबालापरंबील सुधीकुमार या संशोधकांनी या प्रजातींचा शोध लावला आहे. या सर्व प्रजाती (jumping spider) स्टेणेलुरीलस वर्गातील आहेत. महाराष्ट्रातील प्रजातींचे स्टेणेलुरीलस सोलापूर आणि स्टेणेलुरीलस नळदुर्ग अशी त्यांच्या प्रदेशानुसार नामकरण करण्यात आले आहे. तर, तमिळनाडूतील प्रजातींपैकी विल्लुपुरममध्ये सापडलेल्या प्रजातीचे ‘स्टेणेलुरीलस फेरल’ आणि कोइंबतुरमध्ये सापडलेल्या प्रजातीचे ‘स्टेणेलुरीलस जुदिथब्लेस्टर्नी’ असे नामकरण करण्यात आले आहे.

हे वाचलंत का?: वसई किल्ल्याजवळ दुचाकीची बिबट्याला धडक!

ही आहेत वैशिष्ट्ये...

संशोधकांनी या प्रजाती पश्चिम घाट, दख्खनचे पठार आणि पूर्व समुद्र तटावरील भागातून शोधल्या आहेत. स्टेणेलुरीलस वर्गामध्ये यापुर्वी १६ प्रजातींचा समावेश होता तर आता नव्याने शोधलेल्या या चार प्रजातींमुळे ही संख्या २० वर गेली आहे. कोळ्यांच्या बहुतेक प्रजाती पानझडी, काटेरी वणे, उष्कटिबंधीय तसेच उंच पर्वत रांगांमध्ये आढळत असून या प्रजातीतील नर विविधरंगी असतात. मादीला आकर्षित करण्यासाठी नर प्रणय नृत्य करतात.



पाच प्रजातींच्या नव्या स्थानावरून केल्या नोंदी...

या संशोधन अहवालातील आणखी एक उल्लेखणीय गोष्ट म्हणजे भारतभरातील वेगवेगळ्या राज्यांमधून ५ प्रजातींची नव्याने नोंद करण्यात आली आहे. ती खालीलप्रमाणे -

spiders research
“भारतात कोळयाच्या प्रजाती अभ्यासाच्या दृषटिकोनातून नेहमीच दुर्लक्षित राहिल्या. अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मर्गावर असून त्यामध्ये विशेषतः प्राचीन प्रदेशनिष्ठ प्रजातींचा समावेश आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे कोळी कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वपुर्ण काम करतात. त्यामुळेच त्यांच्यावर संशोधन आणि अभ्यास होणे अत्यंत गरजेचं आहे.” - गौतम कदमसंशोधक




समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.