मुंबई : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड(NALCO) अंतर्गत नोकरीची संधी मिळणार आहे. उद्यापासून म्हणजेच दि. ०४ मार्च २०२४ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरूवात होणार आहे. दरम्यान, या पदभरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ०४ मार्चपासून अर्ज करता येणार आहे. नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या एकूण २७७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व अर्ज पध्दतीबद्दल सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
पदाचे नाव -
मेकॅनिकल ( १२७ जागा )
इलेक्ट्रिकल (१०० जागा )
इन्स्ट्रूमेंटेशन (२० जागा)
मेटालर्जी ( १० जागा)
केमिकल ( १३ जागा)
केमिस्ट्री ( ०७ जागा)
शैक्षणिक पात्रता -
संबंधित पदांच्या आवश्यकतेनुसार तत्सम विषयातील पदवीप्राप्त
वयोमर्यादा -
३० वर्षे
वेतनमान -
६०,००० - १,८०,००० रुपये.
अर्ज शुल्क -
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५०० रुपये
इतर उमेदवारांकरिता अर्ज शुल्क १०० रुपये
दि. ०४ मार्च २०२४ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरूवात
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०२ एप्रिल २०२४ असेल.