लोकसभा निवडणुक २०२४! जाणून घ्या ओवेसींना आव्हान देणाऱ्या 'डॉ. माधवी लता' यांचा इतिहास
03-Mar-2024
Total Views |
हैदराबाद : भारतीय जनता पक्षाने शनिवारी दि. २ फेब्रुवारी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये हैदराबादमध्ये AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भाजपने डॉ. माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा देशभरात सुरू आहे. माधवी यांना उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर तिच्या समर्थनार्थ प्रचार सुरू झाला आहे.
माधवी यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्या हैदराबादमधील एका प्रसिद्ध रुग्णालयाच्या अध्यक्षा आहेत. माधवी लता एक व्यावसायिक भरतनाट्यम नृत्यांगना आहे. त्यांनी आतापर्यंत १०० हून अधिक स्टेज परफॉर्मन्स दिले आहेत. विद्यार्थी दशेत माधवी एनसीसी कॅडेटही होत्या.
डॉ. माधवी लता यांना तेलंगणातील हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या प्रमुख चेहरा आहेत. कोटी महिला महाविद्यालयातून राज्यशास्त्रात एमए केल्यानंतर त्या शिक्षण, आरोग्य अशा सामाजिक कार्यात खूप सक्रिय आहेत. त्या सामाजिक कामे ट्रस्ट आणि संस्थांच्या माध्यमातून करते. हैदराबादमधील भाजपच्या पहिल्या महिला उमेदवार माधवी यांनी हिंदू धर्मावर दिलेली भाषणे अनेकदा व्हायरल होतात.
उमेदवार म्हणून त्यांचे नाव समोर आल्यानंतर माधवी यांनी एएनआयशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की गेली ८ वर्षे त्या सतत हैदराबादच्या लोकसभा मतदारसंघात जात आहेत. त्या भागातील विकास पूर्णपणे ठप्प झाला असून शिक्षण, स्वच्छता, आरोग्य या मूलभूत सुविधांपासून लोक वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला. माधवी पुढे म्हणाल्या की, मदरशांमध्ये मुलांना जेवण मिळत नसताना हिंदूंची अनेक मंदिरे ताब्यात घेण्यात आली आहेत.
हैदराबाद मतदारसंघातील हिंदू समाजाला दररोज समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. माधवी यांनी आरोप केला की, मुस्लिम मुलांनाही बालमजुरी करण्यास भाग पाडले जात आहे. माधवी पुढे म्हणाल्या की, ओवेसींसारखे लोकं हिंदू-मुस्लिम यांच्यात वाद निर्माण करून निवडून येतात.
भारतीय जनता पक्षाने माधवी लता यांना रिंगणात उतरवलेल्या हैदराबाद मतदारसंघावर १९८४ पासून ओवेसी कुटुंबाचे वर्चस्व आहे. ओवेसी यांचे वडील सुलतान सलाउद्दीन १९८४ मध्ये पहिल्यांदा येथून खासदार झाले. सुलतान सलाउद्दीन २००४ पर्यंत येथून जिंकत राहिले, त्यानंतर आता असदुद्दीन ओवेसी ही जागा जिंकत आहेत.