माणुसकीला काळिमा फासणारी घटना! ४० वर्षांच्या 'शाकीर'ने केला ३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

    29-Mar-2024
Total Views | 60
 womans
 
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत एका ३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. शाकीर असे आरोपीचे नाव असून त्याचे वय ४० वर्षे आहे. लैंगिक अत्याचारामुळे पीडितेची प्रकृती खालावली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. शाकीर सध्या फरार आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
ही घटना गुरुवारी, दि. २८ मार्च २०२४ दिल्लीतील मियांवली नगर पोलीस स्टेशन परिसरात घडली. येथे ३ वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहते. शाकीरही पीडितेच्या शेजारी भाड्याच्या घरात त्याच्या कुटुंबासह राहतो. ४० वर्षांचा शाकीर हा तीन मुलांचा बाप असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी मुलगी घराजवळ खेळत होती. दरम्यान, शाकीरने मुलीला उचलून आपल्या खोलीत नेले. येथे त्याने मुलीवर बलात्कार केला, असा आरोप आहे.
 
 
मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून लोक शाकीरच्या खोलीकडे धावले. लोक येत असल्याचे पाहून शाकीरने मुलीला सोडले आणि अरुंद रस्त्यावरून पळू लागला. पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे की, जेव्हा शाकीरला थांबवण्यात आले तेव्हा तो पीडितेच्या वडिलांना म्हणाला, " तू काय करणार?" कोणालाही बोलवा. जे काही करायचं होतं ते मी केलं." लोक आत पोहोचले तेव्हा मुलगी खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळली. रक्तबंबाळ अवस्थेत मुलीला घेऊन लोक हॉस्पिटलच्या दिशेने धावले. पीडित मुलीच्या वडिलांनी भीती व्यक्त केली की, मुलगी जगण्याची शक्यता फारच कमी आहे.
 
शाकीरच्या कुटुंबातील इतर सदस्य या घटनेबाबत अनभिज्ञ असल्याचा दावा करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शाकीरला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करत मियांवली नगर पोलीस ठाण्यात लोकांचा जमाव वाढू लागला. संतप्त लोकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. घटनास्थळी डीसीपी पोहोचले आणि त्यांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू केला.
 
संतप्त जमावाने पोलिसांना आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्यासाठी २४ तासांची मुदत दिली. पोलिस घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून शाकीरला पकडण्यासाठी छापेमारी करत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये शाकीरची खोली दिसत आहे ज्यामध्ये मुलीवर बलात्कार झाला होता. अतिशय अरुंद असलेल्या या खोलीत दारूच्या बाटल्या आणि पलंग अस्ताव्यस्त पडलेला दिसतो. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने शाकीरला जिहादी म्हटले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121