होळी साजरी केली म्हणून कट्टरपंथीयांकडून मारहाण!

    25-Mar-2024
Total Views | 464
 attacked people
 
हैदराबाद : तेलंगणातील मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यातील चेंगीचेर्ला भागात होळीचा सण साजरा करत असताना कट्टरपंथी जमावाने जमावाने हल्ला केला. होलिका दहनानंतर मशिदीलगतच्या परिसरात कट्टरपंथी लोकांनी होळी साजरा करणाऱ्या जमावावर हल्ला केला, ज्यात महिलांसह अनेक लोक जखमी झाले. ही घटना रविवारी, दि. २४ मार्च २०२४ संध्याकाळी घडली, त्यानंतर संपूर्ण परिसरात तणाव पसरला.
 
एएनआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, चेंगीचेर्लाच्या ब्रास बस्तीमध्ये होळी साजरी करत असताना काही लोकांनी स्पीकर लावले. काही लोकांनी त्याला आवाज बंद करण्यास सांगितले, ज्यामुळे दोन समुदायांमध्ये वाद झाला, जो एकमेकांवर हल्ल्यांमध्ये वाढला. ही घटना रविवारी सायंकाळी ४.१५ वाजता घडली. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
 
 
शुभी विश्वकर्मा यांनी एक्सवर लिहिले, “हा व्हिडिओ तेलंगणातील आहे, जिथे इस्लामिक जमावाने अनुसूचित जातीच्या लोकांवर हल्ला केला कारण त्यांनी मशिदीजवळ होलिका जाळली. नमाजच्या वेळी होळी साजरी केल्याने हे लोक चिडले होते, कारण होळीची गाणी वाजवली जात होती.
 
दुसरीकडे, तेलंगणातील खम्मममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये स्थानिक लोकांनी टेकुलापल्ली परिसरातील दारूच्या दुकानांवर हल्ला करून तेथून दारूच्या पेट्या पळवून नेल्या. दारू चोरीच्या या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये महिलांचाही सहभाग होता, त्या दारूच्या पेट्या पळवताना दिसत होत्या. सुमारे १५ ते २० लाख रुपयांची दारू लंपास झाल्याचा आरोप वाईन शॉप मालकांनी केला आहे. आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..