‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
23-Mar-2024
Total Views | 1333
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कमाई आली समोर.
मुंबई : रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चरित्रपट २२ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित झाला. सावरकरांचे (Swatantryaveer Savarkar) संपुर्ण राजकीय, वैयक्तिक जीवन या चित्रपटात मांडण्यात आले आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाने देशभरात आणि जगभरात पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने देशात पहिल्या दिवशी म्हणजेच प्रदर्शनाच्या दिवशी १.१० कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.६० कोटीं कमावले आहेत. सावरकरांचा इतिहास जगभरातील लोकांपर्यंत आणि येणाऱ्या भावी पिढीपर्यंत पोहोचावा हा या चित्रपटाचा हेतु आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, सहनिर्मिती आणि अभिनय रणदीप हुड्डा याने केले आहे. तर अंकिता लोखंडे हिने या चित्रपटात यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना रणदीप म्हणाला होता की, “आपले मनोगत व्यक्त करताना रणदीप म्हणाला, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची व्यक्तीरेखा साकारताना त्यांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा मी चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा साकारताना अनुभवली. देशासाठी त्यांनी जो संघर्ष केला तो जगासमोर आला पाहिजे याच अट्टहासामुळे मी या चित्रपटाचे दिग्दर्शक देखील करण्याचा निर्णय घेतला”.