मुंबई : 'IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ' अंतर्गत नोकरची मोठी संधी निर्माण झाली आहे. IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १०७४ रिक्त पदांकरिता भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. दि. ०६ मार्च २०२४ पासून अर्ज स्वीकृतीस सुरूवात झाली आहे. IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत भरतीकरिता इच्छुक उमेदवारांकरिता अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि अर्जाची अंतिम तारीख याबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
पदाचे नाव -
ग्राहक सेवा एजंट
(एकूण १०७४ रिक्त जागा)
शैक्षणिक पात्रता -
किमान १२ वी उत्तीर्ण असणे बंधनकारक
वयोमर्यादा -
१८- ३० वर्षे
वेतनश्रेणी -
२५ - ३५ हजार रुपये.
परीक्षा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत निकाल जाहीर करण्यात येईल.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. २२ मे २०२४ असेल.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा