‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता
20-Mar-2024
Total Views | 49
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चरित्रपटाचा ट्रेलर समोर आला असून लवकरच चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत एक दिग्गज मराठमोळा कलाकार झळकणार आहे.
मुंबई : रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दोन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटात रणदीप स्वत: वीर (Swatantryaveer Savarkar) सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर या चित्रपटातील आणखी महत्वाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची झलक समोर आली आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoanakr) या चित्रपटात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्यांचा लूक समोर आला आहे.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या टीमने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारणाऱ्या सचिन यांचे पोस्टर शेअर केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात सचिन यांच्या अभिनयाची झलक 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्यानिमित्ताने दिसणार आहे.
दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर प्रदर्शित झाला असून यात वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधील फरक दिसून येत आहे. त्यामुळे भव्य अशा या चरित्रपटासाठी प्रेक्षक अधिक उत्सुक आहेत यात शंका नाही. दरम्यान, रणदीप हुड्डा दिग्दर्शित, लिखित, अभिनित आणि निर्मित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.