अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी 'आदिल' पोलिसांच्या ताब्यात
20-Mar-2024
Total Views | 75
लखनौ : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आदिल नावाच्या तरुणावर बलात्काराचा आरोप आहे. सततच्या बलात्कारामुळे १४ वर्षीय पीडित मुलगी गरोदर राहिली. कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आदिलने पीडितेला दिली होती. पोलिसांनी सोमवारी, दि. १८ मार्च २०२४ एफआयआर नोंदवून आदिलला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून इतर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
हे प्रकरण गाझियाबाद आयुक्तालयातील मुरादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे दि. १८ मार्च रोजी पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. फिर्यादीत त्याने कुटुंबासह मुरादनगर येथे राहत असल्याचे म्हटले आहे. पीडितेचे वय १३ ते १४ वर्षे असून, गेल्या अनेक दिवसांपासून ती पोटदुखीची तक्रार करत होती. दि. दि. १८ मार्च रोजी मुलीचे वडील आपल्या मुलीला डॉक्टरकडे घेऊन गेले. या अहवालात पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडिता स्वतःही घाबरली होती.
पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीला विश्वासात घेतल्यावर मुलीने आदिलचे नाव घेतले. शौकीनचा मुलगा आदिल हा मुरादनगर येथील रहिवासी आहे. पीडितेने सांगितले की, ती काही दिवसांपूर्वी आदिलच्या घरी गेली होती. येथे आदिलने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आदिलने पीडितेला कुठेही तोंड उघडल्यास धमकी देत तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. सततच्या बलात्कारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली.
आदिलवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आदिलविरुद्ध १८ मार्चलाच एफआयआर नोंदवला. हा एफआयआर आयपीसीच्या कलम ३७६ (२) आणि ५०६ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४ (२) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. दि. 18 मार्च रोजीच पोलिसांनी रात्री छापा टाकून आदिलला अटक केली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित मुलगी सहावीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. मुलीचे वडील तक्रार घेऊन आरोपीच्या घरी पोहोचले असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली. सध्या पीडितेची वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशन करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी व इतर कायदेशीर कारवाई सुरू आहे.