“रामराज्य रावणाचा वध करुन मिळाले”, सावरकर-गांधी यांच्या विचारधारेतील फरक दाखवणारा नवा ट्रेलर
20-Mar-2024
Total Views | 54
रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर भेटीला आला आहे.
मुंबई : रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित भव्य चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) अखंड भारताबद्दलची व्याख्या, त्यांचे देशाप्रती असणारे प्रेम आणि शरीरात भिनलेले हिंदुत्व या सर्व बाबी उलगडण्याचा प्रयत्न ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटात करण्यात आला आहे. वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधील थेट फरक निदर्शनास आणून देणारा या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाच्या नव्या ट्रेलरमध्ये महात्मा गांधी वीर सावरकर यांच्यात रामराज्य कसे मिळाले? या विषयावर संवाद सुरु असलेला दाखवला आहे. तसेच, मतदानासाठी गांधीचे मुस्लिमांप्रती झुकणारे पारडे आणि त्यावर वीर सावरकरांचे स्पष्ट विचार देखील या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट २२ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा सोबत अंकिता लोखंडे, अमिंदरदीप सिंह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर पहिली वेब सीरीज येणार भेटीला
एकीकडे रणदीप हुड्डा स्वातंत्र्यवीर सावरकर हा चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. तर दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित पहिली हिंदी वेब सीरीज देखील प्रदर्शित होणार आहे. 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' असे या वेब सीरीजचे नाव असून याचे दिग्दर्शन आणि लेखन योगश सोमण यांनी केले आहे. सोमण यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले होते की, “वीर सावरकर यांचे जीवन हा जवळपास १०० वर्षांचा इतिहास आहे. यातून लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, लोकांचे गैरसमज दूर व्हावे, राजकीय, सामाजिक स्वार्थांसाठी तयार केली जाणारी काही मते पुसली जावीत हा या वेब सीरीज बनवण्यामागे आमचा हेतु आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त सावरकर यांचे कुणीही गुरु नव्हते. सावरकर जन्मतः नेते होते. एकलव्यासारखी त्यांची वाटचाल असून सिक्रेट फाईल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहित नाही ते लोकांपर्यंत मांडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे”.