“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”, महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर'चा टीझर प्रदर्शित

    20-Mar-2024
Total Views | 101
महेश मांजरेकर यांचा 'जुनं फर्निचर' लवकरच भेटीला, २६ एप्रिलला होणार प्रदर्शित
 

mahesh manjarekar 
 
मुंबई : दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांचा नवा चित्रपट ‘जुनं फर्निचर’ लवकरच भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. ‘या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा’ (Mahesh Manjarekar) या वाक्यावरुनच ज्येष्ठ नागरिकांबद्दल (Mahesh Manjarekar) चित्रपटाचे कथानक असणार हे तर नक्कीच. या चित्रपटाच्या टीझरचा सोहळा दादरयेथील छत्रपती शिवाजी पार्क मधील नाना-नानी पार्क येथे संपन्न झाला. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते.
 
दिग्दर्शक महेश मांजरेकर चित्रपटाबद्दल म्हणाले की, '' हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यापैकीच हा 'ओल्ड फर्निचर' म्हणजेच 'जुनं फर्निचर'. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली 'जुनं फर्निचर' म्हणतात. परंतु हेच जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते, हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे. यात भावना दडलेल्या आहेत. चित्रपटगृहातून बाहेर पडताना 'जुनं फर्निचर'बद्दलचा दृष्टिकोन बदलावणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीमही अतिशय दमदार आहे. काहींसोबत मी याआधीही काम केले आहे. निर्माते यतिन जाधवसोबतही यापूर्वी मी 'दे धक्का २' केला होता. त्यामुळे एकंदरच ही मस्त भट्टी जमून आली आहे.''
 
हे वाचलंत का? - 'IFFI'मध्ये मराठी चित्रपटाचा डंका! महेश मांजरेकर आणि मधुरा वेलणकर यांच्या 'बटरफ्लाय'चा विशेष शो  
 
सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे दिग्दर्शनासोबत संवाद, पटकथा आणि निर्मिती देखील महेश मांजरेकर यांनीच केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा