टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने घेतली राजकीय निवृत्ती!

    02-Mar-2024
Total Views | 126
Team India Politics

नवी दिल्ली :
  लोकसभा निवडणुकीचे पडघम लवकरच वाजण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू तथा खासदार गौतम गंभीर राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गंभीरने आता मोठा निर्णय घेत पुन्हा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे म्हटले आहे.
 
 
दरम्यान, गौतम गंभीरने राजकीय निवृत्तीबाबत ट्विट केले असून त्याने म्हटले आहे की, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहित यासंदर्भात विनंती केली आहे. मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली, असे गंभीरने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.


माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचेही निवडणुकीबाबत स्पष्टीकरण
 
भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंग गुरुदासपूर येथून निवडणूक लढविणार आहे, असे बोलले जात होते. यावर आता युवराजने स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला, मी गुरुदासपूरमधून निवडणूक लढवणार नाही. दरम्यान, फाऊंडेशनच्या माध्यमातूनच लोकांना मदत करेल. तसेच, माध्यमांतून युवराजबद्दल असं सांगण्यात येत होते की भाजप त्यांना गुरुदासपूरमधून उमेदवारी देऊ शकते.

अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121