मौलनाच्या क्रुरतेचा कळस! चोरीच्या आरोपावरून विवस्त्र करून मारहाण अन्..

    02-Mar-2024
Total Views | 89
Madrasa Cleric Booked For Brutal Punishment Of Student

छत्रपती संभाजीनगर
: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने १०० रुपये किमतीचे घडयाळ चोरले. त्यानंतर मदरशाचे मौलाना सय्यद उमर अली यांनी चोरीच्या आरोपीमुळे विद्यार्थ्याला 'क्रूर शिक्षा' देण्याचा निर्णय घेतला. १६ वर्षीय़ मुलाला अर्धनग्न करून त्याच्या सहकारी मित्रांना त्यांच्यावर थुंकायला लावले. एवढेच नाही तर त्याला बेदम मारहाणही केली.पीडित विद्यार्थी हा गुजरातमधील सुरत येथील रहिवासी आहे. त्याला छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद भागातील जामिया बुरहानुल उलूम मदरशात दाखल करण्यात आले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने जवळच्या दुकानातून घड्याळ चोरले. त्या घड्याळाची किंमत फक्त १०० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. चोरीची घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानदाराने तत्काळ तक्रार दाखल केली. चोरीचा माल जप्त करण्यात आला. नंतर मदरशाचे मौलवी सय्यद उमर अली यांनी विद्यार्थ्याला क्रूर शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पीडित विद्यार्थ्याला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर मौलवीने इतर विद्यार्थ्यांकडून ही पीडित विद्यार्थ्यांला मारहाण करायला लावले.त्यानंतर या कृत्याचे फुटेज पीडितेच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्यावर ते घाबरले. त्यांनी ही माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात दिली आणि तक्रार दाखल केली. याप्रकरणी मौलवीविरुद्ध अल्पवयीन विद्यार्थी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप मौलवीला अटक करण्यात आलेली नाही. तसेच इतर विद्यार्थ्यांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे.

सध्या मदरशांमध्ये अशा घटना सर्रास घडतात. केवळ मारहाणीच्याच नाही तर लहान मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एका मदरशाच्या मौलवीने विद्यार्थिनींचा विनयभंग आणि आपल्या महिला सहकारी शिक्षिकेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मोहम्मद तहसीन असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तहसीनवर कडक कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी निदर्शने केली होती.

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121