नवी दिल्ली : सन २०२० च्या दिल्ली हिंदूविरोधी दंगलीत पीएफआयचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सिद्दिक कप्पनने भाजप नेते कपिल मिश्रा आणि परवेश वर्मा यांना ठार मारण्याचे निर्देश दिले होते, अशी धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. दिल्लीतील दंगलीबाबत प्रसिध्द झालेल्या अहवालात म्हटले आहे की, पीएफआय हिट पथकातील सदस्यांना कप्पनकडून ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, पीएफआय हिट पथकातील सदस्य वैयक्तिकरित्या निवडले गेले असून त्यांना "थिंक टँक" सिद्दीक कप्पन याने प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे युएपीए कायद्यांतर्गत आरोपी असलेला केरळस्थित पत्रकार सिद्दीक कप्पनला दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर जामीन मिळाले होते. त्यानंतर एका वर्षातच धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
कायद्याने बंदी असलेली कट्टरपंथीय संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) पुरस्कृत 'हिट स्क्वॉड'ला कसे निर्देश दिले गेले याचा ऊहापोह सदर अहवालात करण्यात आला आहे. २०२० साली झालेल्या दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीनंतर भाजप नेते परवेश वर्मा आणि कपिल मिश्रा यांची हत्या करण्यात आली.
दरम्यान, मल्लपुरम येथील कमांडर कमल केपी याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सदर दंगलीत पीएफआय सदस्यांचे हिंदूंना लक्ष्य करण्याचा भाजपच्या नेत्याच्या प्रयत्नांमुळे संतप्त झालेल्या सिद्दीक कप्पन याने असे आदेश दिले होते.