दक्षिणेत पीएमके-भाजप युती, पंतप्रधान मोदींचा यशस्वी दौरा!

    19-Mar-2024
Total Views | 60
PMK BJP Alliance in Tamilnadu


नवी दिल्ली :      'इंडिया आघाडीचे नेते हिंदू धर्माला शिव्या देण्यात एक सेकंदही घालवत नाहीत', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये जाहीर सभेत म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीवर टीका केली असून ते म्हणाले, डीएमके-काँग्रेससह संपूर्ण देशावर हल्ला चढवला आहे. तसेच, इंडिया आघाडीचे नेते जाणूनबुजून हिंदू धर्माचा अपमान करत आहे, असेही पंतप्रधांनांनी जनतेला संबोधित करताना म्हटले आहे.
 
दरम्यान, पंतप्रधान मोदी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या ५ दिवसांपासून दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. तामिळनाडूतील सेलम येथील जाहीर सभेत संबोधित करताना ते म्हणाले की, इंडिया ब्लॉकचे नेते जाणूनबुजून हिंदू धर्माचा अपमान करत आहेत, तर हे लोक इतर कोणत्याही धर्मावर भाष्य करत नाहीत.

दि. १९ मार्च रोजी सकाळी केरळच्या पलक्कडमध्ये रोड शो केल्यानंतर पंतप्रधान तामिळनाडूतील सेलम येथे पोहोचले, जिथे त्यांनी रोड शो केल्यानंतर एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्ष आणि विरोधी इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला.


पट्टाली मक्कल काची पार्टी (पीएमके) पक्षासोबत भाजपची युती

एनडीए २०२४ मध्ये ४०० पार लक्ष्य घेऊन लोकसभा निवडणूक लढवत आहे. हा आकडा गाठण्यासाठी भाजपला दक्षिण भारतात युतीची आवश्यकता होती. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर आता स्थानिक पक्ष पीएमके म्हणजेच पट्टाली मक्कल काची पार्टीसोबत युती केली आहे. पक्षाचे अध्यक्ष अंबुमणी रामदास म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या कार्याने प्रेरित होऊन देशाच्या विकासात सहकार्य करण्यासाठी भाजपसोबत युती केली आहे.

पीएमके अध्यक्ष रामदास म्हणाले की, पीएमके गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीतील एनडीएचा भाग आहे. परंतु आता आम्ही आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमकेने तामिळनाडूमध्ये भाजपसोबत युती केली असून जागावाटप निश्चित केले आहे. भाजप राज्यातील ३९ पैकी २९ जागांवर निवडणूक लढवणार असून पीएमके १० जागांसह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121