SEBI Recruitment 2024 : 'सेबी' अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, लवकरच अर्जप्रक्रिया सुरू होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

    17-Mar-2024
Total Views | 69
SEBI Recruitment 2024


मुंबई :   'सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)' मध्ये नवीन भरती केली जाणार आहे. सेबीकडून या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. देशभरात डि-मॅट अकाउंटमध्ये वाढ झाल्यानंतर सेबीकडून नवनवीन निर्णय नव गुंतवणूकदारांसाठी घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता याच सेबीमध्ये काम करण्याची चांगली संधी तरुणांना मिळणार आहे. सेबीकडून रिक्त जागांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली असून या अंतर्गत एकूण ९७ रिक्त जागांकरिता भरती केली जाणार आहे.
रिक्त पदांकरिता उमेदवारांना १३ एप्रिलनंतर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा असून सेबीच्या अधिकृत वेबसाईटवर अर्जासंदर्भात तपशील उमेदवारांना उपलब्ध असतील. तसेच, अर्जाची अंतिम मुदतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


पदाचे नाव -


सहाय्यक व्यवस्थापक ( ग्रेड A अधिकारी)

जनरल ( ६२ जागा )
लीगल ( ५ जागा )
माहिती तंत्रज्ञान ( २४ जागा )
इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ( ०२ जागा )
रिसर्च ( ०२ जागा )
अधिकृत भाषा ( ०२ जागा )

 
शैक्षणिक पात्रता -
 
मास्टर डिग्री किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीधर


वयोमर्यादा -

कमाल ३० वर्षे


वेतनश्रेणी -
 
४४,५०० - ८९,१५० रुपये


नोकरीचे ठिकाण -

भारत

 
अर्ज शुल्क -
 
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता १ हजार रुपये अधिक जीएसटी
ओबीसी, ईडबल्युएस वर्गातील उमेदवारांकरिता १०० रुपये अधिक जीएसटी

 
सदर भरतीकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, संपूर्ण भारतभर कुठेही परीक्षा केंद्र मिळेल
 
.
बोर्डाने १४ मार्च२०२४ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्जप्रक्रिया दि. १३ एप्रिल २०२४ पासून सुरू होईल
 
अंतिम तारीख संदर्भात अपडेट्स उमेदवारांना सेबीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होतील.
 

अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समजून घेणे आवश्यक!, रा.स्व.संघाबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समजून घेणे आवश्यक!, रा.स्व.संघाबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी?

( Narendra Modi work of the Rashtriya Swayamsevak Sangh ) “बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकींना उपस्थित राहणे माझ्यासाठी आनंददायी होते. आपण देशासाठी समर्पित जीवन जगावे, हे मला रा. स्व. संघाने शिकवले. यावर्षी 100 वर्षे पूर्ण करणार्‍या रा. स्व. संघापेक्षा जगात अन्य दुसरा मोठा स्वयंसेवी संघ नाही.‘आरएसएस’ समजून घेणे सोपे काम नाही, त्याचे कार्य समजून घेणे आवश्यक आहे,” अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत ..