मशिद पाडलेल्या जागी नमाज पढण्याची मागणी; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

    17-Mar-2024
Total Views | 58
masjid 

नवी दिल्ली :
दिल्लीतील मेहरौली येथे बेकायदेशीरपणे बांधलेल्या एका मशिदीवर कारावाई करण्यात आली होती. या जागेवर रमजानच्या महीन्यात नमाज पढण्याची परवानगी मिळावी म्हणुन याचीका दाखल करण्यात आली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
 
दिल्लीतील मेहरौली येथे असलेल्या या मशिदिचे नाव अखूनजी मशीद असे होते. ही मशिद ६०० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. ३० जानेवारीला दिल्ली विकास प्राधिकरणाने ती बेकायदेशीर असल्याने जमिनदोस्त केली होती. या मशिदीसोबतच एक मदरसाही डीडीएने पाडला होता. ज्याचे नाव बहरुल मदरसा असे होते. या कारवाईनंतर सुध्दा या जागेवर काही लोक नमाज पढण्यासाठी प्रयत्न करत होते. यापुर्वीही न्यायालयात या मशिदीत नमाज पढण्याची परवानगी मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. ही जागा दिल्ली वक्फ बोर्डाची जागा आहे असेही या याचिकेत नमुद करण्यात आले होते.
डीडीएच्या या कारवाईनंतर या कारवाई विरोधात अनेकदा याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ५ फेब्रुवारी २०२४ ला उच्च न्यायालयाने डीडीएच्या कारवाईचे समर्थन केले होते. त्यानंतर २३ फेब्रुवारीला या जागेवर शब-ए-बारात साजरी करण्याची मागणी करणाऱी याचीका दाखल करण्यात आली होती. ही याचीका सुद्धा उच्च न्यायालयाने फेटाळुन लावली होती.
 
याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी अनेकांच्या कुटुंबीयांच्या कबरी आहेत. त्यामुळे तेथे नमाज अदा करण्याची परवानगी मिळावी. पण डीडीएने ही बांधकामे बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्यांची त्या जागेवर नमाज अदा करण्याची मागणी फेटाळली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
वटवृक्षाविरोधात निघाला फतवा, धर्मांधांनी चालवली करवत; हिंदूंमध्ये संतापाची लाट!

वटवृक्षाविरोधात निघाला फतवा, धर्मांधांनी चालवली करवत; हिंदूंमध्ये संतापाची लाट!

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तेवरून पायउतार झाल्यापासून बांगलादेश एका उन्मादाकडे वाटचाल करत आहे हे स्पष्ट आहे. इस्लामिक कट्टरपंथी लोक प्रत्येक विभागात, सामाजिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व गाजवू पाहतायत. सरकारी किंवा सामाजिक पातळीवर घेतलेल्या निर्णयांवर प्रभाव पाडणे हा त्यांचा शरिया अधिकार मानतात. हिंदूंची प्रतिके धर्मांधांना एकतर धोकादायक वाटतात किंवा त्यास हराम म्हणून संबोधतात. हिंदूंसाठी पवित्र असलेले वडाचे प्राचीन झाड 'शिर्क' म्हणून तोडल्याचे निदर्शनास आले आहे Islamists destroy ..

तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डीडीए प्रशासनाने पोलिस आणि इतर विभागांसह सोमवार, दि. ५ मे रोजी तैमूर नगर नाल्याभोवतीच्या अतिक्रमणांविरुद्ध मोठी कारवाई केली. नाल्याच्या नऊ मीटर परिसरात असलेल्या अनेक बेकायदेशीर इमारती आणि त्यांच्या बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींनी नाल्याजवळील जमिनीवर अतिक्रमण केले होते. आतापर्यंत, बेकायदेशीरपणे बांधलेली १०० हून अधिक घरे आणि दुग्धशाळा पाडण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिस ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121