मध्य रेल्वे १२ अतिरिक्त विशेष ट्रेनसह होळीकरिता प्रवाशांच्या सेवेत!

    17-Mar-2024
Total Views | 41
Central Railway Special Trains


मुंबई :    मध्य रेल्वेने यापूर्वी ११२ होळी विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. आता सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त १२ होळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट)-गोरखपूर-छशिमट विशेष या गाडीक्रमांकात बदल झाला असून ती आता 01103/01104 या क्रमांकाऐवजी 01083/01084 या क्रमांकाने धावणार आहे.
 

होळीसाठी विशेष गाडी क्र. 01215, 01083, 01471, 01431 आणि 05194 यांचे आरक्षण विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु झालेले आहे. तर मध्य रेल्वेमार्गावरून धावणार्‍या काही विशेष गाड्यांना नागपूर आणि बल्लारशाह स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांनी या विस्तारित सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


1) छशिमट-दानापूर-छशिमट विशेष (2 फेर्‍या)
 
- 01215; दि. 21 मार्च; सुटण्याची वेळ : सकाळी 11.25 (छशिमट)
- 01216; दि. 22 मार्च; सुटण्याची वेळ : सायंकाळी 7.30 (दानापूर)


2) छशिमट-गोरखपूर-छशिमट विशेष (2 फेर्‍या)

- 01083; दि. 22 मार्च; सुटण्याची वेळ : रात्री 10.35 (छशिमट)
- 01084; दि. 24 मार्च; सुटण्याची वेळ : दुपारी 3.30 (गोरखपूर)


3) पुणे-दानापूर-पुणे अतिजलद विशेष (2 फेर्‍या)

- 01471; दि. 21 मार्च; सुटण्याची वेळ : सकाळी 6.30 (पुणे)
- 01472; दि. 22 मार्च; सुटण्याची वेळ : दुपारी 1.30 (दानापूर)


4) पुणे-गोरखपूर-पुणे अतिजलद विशेष (2 फेर्‍या)

- 01431; दि. 22 मार्च; सुटण्याची वेळ : दुपारी 4.15 (पुणे)
- 01432; दि. 23 मार्च; सुटण्याची वेळ : रात्री 11.25 (गोरखपूर)


5) पनवेल-छपरा-पनवेल साप्ताहिक विशेष (4 फेर्‍या)

- 05194; दि. 22 आणि 29 मार्च; सुटण्याची वेळ : रात्री 9.40 (पनवेल)
- 05193; दि. 21 आणि 28 मार्च; सुटण्याची वेळ : दुपारी 3.20 (छपरा)


नागपूर आणि बल्लारशाह स्थानकावर थांबा देण्यात आलेल्या विशेष गाड्या


- 05303 गोरखपूर-महबूबनगर; दि. 24 मार्च; सकाळी 6.40 नागपूर आणि सकाळी 10 बल्लारशाह
- 05051 छपरा-सिकंदराबाद; दि. 31 मार्च; सकाळी 6.40 नागपूर आणि सकाळी 10 बल्लारशाह
- 05304 महबूबनगर-गोरखपूर; दि. 26 मार्च; सकाळी 3.15 बल्लारशाह आणि सकाळी 6.30 नागपूर
- 05052 सिकंदराबाद-छप्रा; दि. 2 एप्रिल; सकाळी 3.15 बल्लारशाह आणि सकाळी 6.30 नागपूर



अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..