मुंबई: प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे युद्ध पातळीवर आर्थिक धोरण ठरवणारी भारतातील प्रथम बँक म्हणून आरबीआयचा जागतिक दर्जावर सन्मान होणार आहे. याबद्दल आरबीआयने (RBI) ने वृत्त देत बँकेची सेंट्रल बँकिंग अवार्ड (Central Banking Award ) मिळवला आहे. यामुळे बँकेची पत आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध होताना दिसत आहे.
शक्तिकांता दास यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक निर्णय घेतले गेले. त्यामुळे सेंट्रल बँक ऑफ लंडनने आरबीआयच्या प्रयत्नांना दाद देत हा पुरस्कार प्रदान केला आहे.
आरबीआयने एक्स वर पोस्ट केलेल्या माहितीनुसार,ERM Framework (न्यू एंटरप्राईज अवार्ड रिस्क मॅनेजमेंट) नुसार चांगल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.
सेंट्रल बँकिंगने एका निवेदनात म्हटले आहे की, RBI सारख्या मोठ्या संस्थेमध्ये १२००० पेक्षा जास्त कर्मचारी सदस्यांसह (नवीन वार्षिक अहवालानुसार) एक नवीन ERM फ्रेमवर्क आणणे कधीही सोपे होणार नाही.