होलिका दहन साजरी करण्यास ख्रिश्चनांकडून मज्जाव!

मढ-लोचर गावातील हिंदू कोळी बांधवांची तक्रार

    16-Mar-2024   
Total Views |
Lochar Village
मुंबई (ओंकार मुळ्ये) : मढ-लोचर (Madh Lochar) गावातील हिंदू कोळी समाज गेल्या कित्येक दशकांपासून लोचर गावच्या समुद्रकिनारी होळी दहन आणि त्यासंबंधीचे अनेक रीतिरिवाज पार पडत आहेत. आजही याठिकाणी कोळी बांधवांमध्ये एकत्र येऊन १५ दिवस होलिका दहन करण्याची आणि लोकगीते गाऊन-लोकनृत्य करून साजरा करण्याची प्रथा आहे. मात्र हिंदू कोळी समाजाला हा सण साजरा करण्यास परिसरातील ख्रिश्चनांकडून मज्जाव होत असल्याचे समोर आले आहे.

लोचर गाव कोळी समाज कृती समिती, मढचे अध्यक्ष पांडुरंग कोळी यांनी सदर प्रकरणी बुधवार, दि. १३ मार्च रोजी मालवणी पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविली आहे. होलिका दहनाच्या तिसऱ्या दिवशी कोळी बांधव पूर्वतयारी व जागेची सफाई करत असताना रिचर्ड किल्मो, जेकब किल्मो, केविन कोळी, शॉन कोळी, फुलुबाई कोळी, प्रिसीला किल्मो या शेजारच्या पाड्यातील ख्रिश्चन समाजाच्या व्यक्तींनी होळी साजरा करण्यास मज्जाव केल्याचे पांडुरंग कोळी यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर 'होळी पेटवल्यास दगडांनी ठेचून मारू' असे म्हणत त्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत धमकावल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याआधी सदर सरकारी जागेवर दगड टाकून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही मज्जाव करणाऱ्यांविरोधात करण्यात आला आहे.

याप्रकरणी मालवणी पोलीस ठाणेकडून मज्जाव करणाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सुचीत करून सुद्धा दखलपात्र गुन्हा घडल्यास फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे दिलेल्या नोटीसचा भंग केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी त्यात म्हटले आहे.

एखादी तक्रार आल्यास त्याची शाहनिशा करून, तठस्थ भूमिका घेत योग्य ती कारवाई करणे आपले कर्तव्य असल्याचे पोलिसांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना म्हटले.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न
१९६४ सालापासून हिंदू कोळी बांधव याठिकाणी पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करत आहेत. सदर जमिनीवर कोळी बांधव पावसाळ्यात होड्या चढवतो. मात्र त्याठिकाणी दगड टाकून होत असलेल्या अतिक्रमाणामुळे सण साजरे करण्यात अडथळे आणले जात आहेत. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- पांडुरंग कोळी, अध्यक्ष, लोचर गाव कोळी समाज कृती समिती, मढ

अन्यथा कोळी बांधव रस्त्यावर उतरेल!
मढ-लोचर गावातील हिंदू कोळी समाज संघटित झाला आहेत. समुद्रालगत असलेल्या सरकारी जमिनीवरील अतिक्रमण त्वरीत हटवले गेले नाही, तर येत्या काही दिवसांत स्वतः कोळी बांधव रस्त्यावर उतरून अतिक्रमण हटवेल हे नक्की!
- प्रिती राऊत, सामाजिक कार्यकर्ता


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक