“देशाला पोखरणाऱ्या किडीच्या सणसणीत कानाखाली मारणारा चित्रपट, ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’

    15-Mar-2024
Total Views | 263
विपुल शाह निर्मित, सुदिप्तो सेन दिग्दर्शित आणि अदा शर्मा अभिनित ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ देशभरात प्रदर्शित झाला आहे.
 

ajay purkar 
 
मुंबई : नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद यांच्यावर थेट भाष्य करणारा आणि छत्तीसगडमधल्या बस्तरमधील माओवादाचे भयाण सत्य मांडणारा ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar The Naxal Story) हा चित्रपट आज १५ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला. नुकताच या चित्रपटाचा प्रिमिअर पुण्यात झाला, तो पाहिल्यानंतर अभिनेते अजय पुरकर यांनी व्हिडिओ शेअर करत भारतातील प्रत्येक नागरिकांना ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar The Naxal Story) चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, “आपल्याच देशाला आतुन लागलेली जी किड आहे त्यांच्या सणसणीत कानाखाली मारणारा हा चित्रपट आहे”, असे देखील अजय पुरकर यांनी म्हटले आहे.
 
हे वाचलंत का? -  ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ मधील नीरजा माधवन कशी घडली? अदा म्हणते...
 
अभिनेते अजय पुरकर यांनी बस्तर : द नक्सल स्टोरी हा चित्रपट पाहिल्यानंतर एक व्हिडिओ शेअर करत चित्रपटाचे कौतुक केले आहे, ते म्हणाले की, “नुकताच ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ हा झंझावाती चित्रपट पाहिला. अभिनेत्री इंदिरा तिवारी हिने अप्रतिम काम केलं आहे. अदा शर्माने तर नेहमीप्रमाणे उत्तमच काम केलं असून दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी द केरला स्टोरी नंतर सुंदर चित्रपट दिला आहे. द केरला स्टोरी नंतर ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ या चित्रपटाच्या टीमने आणखी एक धमाका आणला आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिला पाहिजे. आणि स्वत:च्या मुलांवा देखील हा चित्रपट पाहायला घेऊन जा. देशाला आतून जी किड पोखरत आहे त्यांच्यापासून सावध राहा, नाहीतर ही लोकं आपला देश संपवतील. त्यामुळे देशातील अशा लोकांच्या सणसणीत कानाखाली ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ या चित्रपटाने लगावली आहे. नक्की आवर्जून हा चित्रपट बघा”, असं आवाहन अजय पुरकर यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे.
 
आजही बस्तरमध्ये शाळा, रस्ते, वीजपुरवठा नाही आहे. याबद्दल बोलताना एक व्यक्ती म्हणाली की, बस्तरमध्ये रस्ते डांबराने नाही जवानांच्या रक्ताने बनवले जातात. त्यांची ती वाक्ये ऐकून उपस्थितांच्या अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आले. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांचा बस्तरचा अंगावर काटा आणणारा इतिहास ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून १५ मार्च रोजी मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील

देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!

Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121