दिग्दर्शक राम गोपाल वर्मांचा राजकारणात प्रवेश, या भागातून लढणार निवडणूक

    14-Mar-2024
Total Views | 61
मनोरंजनसृष्टीलाही राजकारणाचे वेध लागले आहेत. दिग्दर्शक-निर्माते राम गोपाल वर्मा यांनी आपला राजकारमातील प्रवेश घोषित केला आहे.
 
 varma 
 
मुंबई : देशात सध्या लोकसभा निवडणूकीचे वातावरण असून अनेक कलाकार देखील राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वीच थलापती विजय यांनी देखील स्वत:चा राजकीय पक्ष सुरु केला होता. आता आणखी एका दिग्दर्शकाने (Ram gopal Varma) त्यांच्या राजकारमाचा प्रवास सुरु केला आहे. दिग्दर्शक - निर्माते राम गोपाल वर्मा (Ram gopal Varma) यांनी नुकतीच राजकारणाच्या त्यांच्या प्रवेशाची पोस्ट केली आहे.
 
हिंदी चित्रपट निर्माते - दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन राजकारणात प्रवेश केल्याची पोस्ट केली. यात त्यांनी लिहिले आहे की, अचानक मी हा निर्णय घेतला अशून आंध्र प्रदेशातील पिठापुरममधून निवडणूक लढवणार आहे”. दरम्यान, तेथे तेलगू देसम पार्टी-भारतीय जनता पार्टी-जन सेना पार्टीने युती जाहीर केल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी ही घोषणा केली.
 
 
 
महत्वाची बाब म्हणजे राम गोपाल वर्मा यांच्याशिवाय अभिनेता आणि जेएसपी प्रमुख पवन कल्याण देखील पिठापुरमच्या जागेवरून निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या जागेसाठी चुरस दिसणार आहे. आत्तापर्यंत राम वर्मा यांनी 'सरकार', 'सत्या', 'रंगीला', 'भूत' अशा दर्जेदार चित्रपटांना प्रेक्षकांच्या स्वाधीन केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..