अश्लील कॉंटेन्ट दाखवणाऱ्या १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने आणली बंदी

    14-Mar-2024
Total Views | 2583
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर कायमच ओटीटी वाहिन्यासह कोणत्याही मनोरंजनाच्या वाहिन्यांवरुन अश्लील कंटेन्ट प्रसारणाच्या विरोधातच होते.
 

ott banned 
 
नवी दिल्ली : चित्रपटगृहांपेक्षा प्रेक्षकांचा अधिक कल करोना काळानंतर ओटीटी वाहिन्यांकडे अधिक दिसून आला. या ओटीटी वाहिन्यांवर अश्लील कंटेंन्ट प्रसारित करण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तब्बल १८ ओटीटी (18 ott platforms banned) वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यात केवळ ओटीटी वाहिन्यांसह (18 ott platforms banned) आक्षेपार्ह कंटेन्ट असलेल्या अॅप्स आणि वेबसाईटचा देखील समावेश आहे. या प्लॅटफॉर्मवर अश्लील वेब सीरिज, चित्रपट दाखवले जात होते त्यांना केंद्र सरकारने चांगलाच फटका दिला आहे.
 
हे वाचलंत का? - 'स्वराज'च्या पहिल्या सीझनचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते लाँच  
 
अश्लील कंटेन्ट प्रसार करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कडक कारवाई करण्याचा इशारा यापुर्वी देखील केंद्र सरकारकडून देण्यात आला होता. १९ वेबसाईट्स, १० ऍप्स (गुगल प्ले स्टोअरवरील ७, ऍपल ऍप स्टोअरवरील ३) आणि ५७ सोशल मीडिया अकाऊंट्स भारतात वापरण्यासाठी निष्क्रीय करण्यात आली आहेत. सर्जनशील अभिव्यक्ती’ च्या नावाखाली अश्लील, असभ्य आणि गैरवर्तनाचा प्रसार होणार नाही यांची जबाबदारी या प्लॅटफॉर्म्सची असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले होते. त्यानंतर १२ मार्च, २०२४ रोजी सरकारने यांनी अश्लील आणि असभ्य आशयाचे प्रसारण करणारे १८ओटीटी प्लॅटफॉर्म्स बंद करत असल्याची घोषणा केली.
 
 
 
दरम्यान, ब्लॅक करण्यात आलेले १८ ओटीटी प्लॅटफॉर्मची नावे पुढीलप्रमाणे :
 
ड्रीम्स फिल्म्स
वूवी
येस्मा
अनकट अड्डा
ट्राई फ्लिक्स
एक्स प्राइम
नियॉन एक्स वीआईपी
बेशरम
शिकारी
खरगोश
एक्स्ट्रामूड
न्यूफ़्लिक्स
मूडएक्स
मोजफ्लिक्स
हॉट शॉट्स वीआईपी
फुगी
चिकूफ़्लिक्स
प्राइम प्ले
 
तसेच, यात फेसबुकवरील १२, इन्स्टाग्रामवरील १७, X वरील १६ अकाऊंट आणि युट्यूब वरील १२ चॅनेलवर देखील कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांच्या हातात आता मोबाईल देताना पालकांना शाश्वती असेल ती त्यांची मुले कोणताही आक्षेपार्ह कंटेन्ट पाहात नाही आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
तृतीयपंथीयांनी पैसे देण्यास नकार देणाऱ्या निष्पाप आदर्शला दिले रेल्वेबाहेर फेकून, रेल्वे पोलिसांनी शोधून काढला मृतदेह

तृतीयपंथीयांनी पैसे देण्यास नकार देणाऱ्या निष्पाप आदर्शला दिले रेल्वेबाहेर फेकून, रेल्वे पोलिसांनी शोधून काढला मृतदेह

Adarsh Murder रेल्वे गाड्यांमध्ये अनेकदा तृतीयपंथीयांकडून पैसे मागताना आरेरावी केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये घोळक्याने असणाऱ्या तृतीयपंथींनी पैसे न देणाऱ्या व्यक्तीला धमकावत मारहाण केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळ-विदिश बासोदादरम्यान, काही तृतीयपंथीयांनी एका प्रवाशाची हत्या करत रेल्वेतून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला असून कुटुंबियांकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे...