बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझरची कारवाई! एका रात्रीत ३ मदरसे, ५ दर्गा जमीनदोस्त!

    13-Mar-2024
Total Views | 36
 bulldozer
 
गांधीनगर : गुजरातमधील बेकायदेशीर अतिक्रमणांवर बुलडोझरची कारवाई सुरूच आहे. याच क्रमाने द्वारका आणि सोमनाथजवळील अवैध अतिक्रमणे हटवल्यानंतर जुनागडच्या माजेवाडी वेशीजवळ बांधलेला दर्गा हटवण्यात आला आहे. याशिवाय कच्छमधील काळ्या टेकड्या मोकळ्या सुद्धा अतिक्रमण मुक्त करण्यात आल्या आहेत, त्यानंतर अंजारमध्येही तीन बेकायदा दर्गे या ठिकाणाहून हटवण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी, दि. १२ मार्च २०२४ अंजार, कच्छमधील सरकारी जमिनीवर बांधलेले तीन दर्गे बुलडोझरने हटवण्यात आले. प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली. यावेळी हाजीपीर दर्गा, नागेशापीर दर्गा आणि वल्लीपीर दर्गा येथे कारवाई करण्यात आली. याशिवाय आणखी एक बांधकामही पाडण्यात आले.
 
हे वाचलंत का? - रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट! हल्लेखोराला मदत करणारा 'शब्बीर' NIA च्या ताब्यात 
 
रात्री उशिरा झालेल्या या कारवाईत परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका पथकालाही पाचारण करण्यात आले होते. बुलडोझरच्या कारवाईपूर्वी सर्व बेकायदा बांधकामांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरच ही कारवाई झाली. याआधी गुजरातमध्ये सरकारी जमिनी अवैध धंद्यांपासून मुक्त करण्याचे काम सातत्याने सुरू आहे.
 
काही काळापूर्वी माजेवाडी गेटजवळील वादग्रस्त धार्मिक स्थळ पाडण्यात आले होते. त्याआधी कच्छमधील खवरा भागात तीन बेकायदेशीर मदरसे पाडण्यात आले होते. शुक्रवारी, दि. ९ मार्च २०२४ कुख्यात गुन्हेगार रझाक सैचा आणि त्याच्या भावाच्या जामनगरमधील दोन बेकायदेशीर बंगल्यांवरही बुलडोझरचा वापर करण्यात आला. याशिवाय दि. ११ मार्च रोजी कच्छमधील अबदासा येथील दोन अवैध दर्ग्यांवर बुलडोझर चालवण्यात आला होता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121