'तामिळनाडूमध्ये CAA लागू करु नका”, थलापती विजयने केला विरोध
12-Mar-2024
Total Views | 42
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात १२ मार्च २०२४ पासून नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आल्याची घोषणा केली.
तामिळनाडू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ मार्च २०२४ रोजी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मागील काही वर्षांपासून नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्यामागे हालचाली सुरु होत्या. आता हा कायदा लागू झाल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेते थलापती विजय संतापले असून त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) तामिळनाडूत लागू करु नका असे वक्तव्य केले आहे.
विजय यांनी सोशल मिडियावर त्यांच्या नव्या तमिळगा वेट्री कडगम (टीवीके) या राजकीय पक्षाच्या ट्विटरवरुन एक पोस्ट करत पत्राद्वारे आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. त्यात लिहिले आहे की, “भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ (सीएए) सारखे कायदे सध्याच्या वातावरणात लागू करता येणार नाही. ते स्विकारण्यासारखे नाही. ज्या देशात सगळ्या जाती धर्माची लोकं गुण्या गोविंदानं राहतात तिथं नेत्यांनी अशा प्रकारचे कायदे का लागू केले जात आहेत”. असा प्रश्न विजयने उपस्थित केला आहे.
पुढे त्याने असेही म्हटले आहे की, “तामिळनाडूमधील नेत्यांनी मी आवाहन करतो की, हा कायदा आपल्या राज्यात लागू होणार नाही याची काळजी आणि विचार त्यांनी करावा”. त्यामुळे आता याचे तामिळनाडूत काय पडसाद उमटणारे हे येणारा काळच ठरवेल.