आकाशातून सागराची निगराणी

    11-Mar-2024   
Total Views | 60
Indonesia

दक्षिण-पूर्व आशियातील इंडोनेशिया हा देश मत्स्यव्यवसायासाठी जगप्रसिद्ध. या देशामध्ये सुमात्रा, जावा, सुलावेसी, बोर्निओ आणि न्यू गिनीच्या काही भागांसह १७ हजारांहून अधिक बेटांचा समावेश होतो. तेव्हा सागरी आणि मत्स्यसंपत्तीचे निरीक्षण करण्यासाठी इंडोनेशिया एक उपग्रह मालिका विकसित करत आहे. या वर्षी जुलैमध्ये या ‘नॅनोसॅटेलाईट’च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त ठरला आहे. यावेळी २० ‘नॅनोसॅटेलाईट्स’पैकी पहिले सॅटेलाईट कक्षेत सोडले जाईल. प्रत्येकी दहा किलोपेक्षा जास्त वजन नसलेल्या, उपग्रहांची मालिका तयार करण्यात येईल. या उपग्रह मालिकेमुळे सागरी आणि मत्स्यपालन संसाधनांचे अधिक कार्यक्षम आणि अचूक व्यवस्थापन शक्य होईल. म्हणूनच इंडोनेशियाच्या मत्स्यपालन मंत्रालयाने देशाच्या सागरी क्षेत्राची देखरेख करण्यासाठी, समुद्री ड्रोनसह ‘नॅनोसॅट’ची योजना आखली आहे.

इंडोनेशियाचे सागरी क्षेत्र ५.८ दशलक्ष चौ. किमी क्षेत्रात पसरलेले. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठी प्रवाळ परिसंस्थेची जैवविविधताही इथे आढळते. पण, या परिसंस्थेच्या संरक्षणासाठी मासेमारी रोखण्याबरोबरच सागरी संसाधनांच्या संरक्षणासाठी देखरेख, निरीक्षण आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणीदेखील आवश्यक आहे. मत्स्यपालन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘नॅनोसॅट’ प्रकल्पाद्वारे एकेकाळी जेथे संवर्धन निष्क्रिय होते, तिथे आता सक्रियपणे ते केले जाईल. या उपग्रह मालिकेच्या माध्यमातून समुद्री आणि मत्स्यसंपत्तीच्या अद्ययावत परिस्थितीची माहिती मिळेल. त्यामुळे कोरल परिसंस्थेच्या संवर्धनाची दिशा ठरविणे सोपे होणार आहे. कोणते समुद्री क्षेत्र पर्यटन किंवा मत्स्यपालनासाठी योग्य आहे, त्याविषयीही माहिती या उपग्रहांच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे.
 
एकूण २० पैकी जुलै महिन्यात एक नॅनोसॅटेलाईट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. मग उर्वरित ‘नॅनोसॅटेलाईट’ प्रक्षेपित करण्यात येतील. यापैकी १२ उपग्रहांमध्ये ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’ उपकरणे असतील, तर पाचमध्ये ‘इमेजिंग’ उपकरणे असतील आणि उर्वरित उपग्रहांमध्ये समुद्रातील जहाजांचा मागोवा घेण्यासाठी, स्वयंचलित ओळख प्रणाली (AIS) सोबत सेन्सर बसवले जातील. २० ‘नॅनोसॅटेलाईट्स’च्या या मालिकेमुळे २४ मिनिटांत इंडोनेशियातील प्रत्येक ठिकाणाची स्थिती एका केंद्रातून जाणून घेणे शक्य होणार आहे. तसेच जहाजांच्या हालचालीवर आणि मत्स्यसंपत्तीवरही निगराणी ठेवता येईल. तसेच अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यपालन आणि सागरी सुरक्षा अधिकारी कृत्रिम बुद्धिमत्तेसह विविध तंत्रज्ञानावर आधारित धोरणे विकसित करत आहेत. या उपक्रमांमध्ये ‘इंडोनेशियन कोस्ट गार्ड’द्वारे ‘इंडोनेशियन सागरी माहिती केंद्र’ (IMIC) आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्या ‘कमांड सेंटर’चा समावेश आहे.
 
मत्स्यव्यवसाय मंत्रालयामार्फत देशाच्या मत्स्यपालन, संवर्धन क्षेत्रे आणि सागरी कुरण, कांदळवने आणि प्रवाळ यांसारख्या आवश्यक सागरी परिसंस्थांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. तसेच सरकारला माहिती देण्यासाठी ‘महासागर लेखांकन’ आणि ‘महासागर बिग डाटा’ ही दोन साधने मत्स्यव्यवसाय मंत्रालयाकडून विकसित केली जात आहेत. अशा प्रकारचे पहिले ‘इंटेलिजन्स हब’ बेकायदेशीर आणि अनियंत्रित मासेमारी तथा इंडोनेशियाच्या समुद्राच्या आसपासच्या क्षेत्रांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. तसेच सागरी सुरक्षा नियमन करणार्‍या एजन्सींमधील समन्वय वाढवून अधिक सुकर होईल. ‘सॅटेलाईट मॉनिटरिंग’चे जाळे अनुकूल करण्यासाठी, लहान-मोठ्या आणि पारंपरिक मासेमारी नौकांना ट्रॅकिंग उपकरणांसह विनामूल्य सज्ज करण्याची योजना मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने आखली आहे.
 
 इंडोनेशियात ३० ग्रॉस टनेज (GT) पेक्षा मोठ्या जहाजांना आधीपासूनच ’व्यावसायिक जहाज निरीक्षण प्रणाली’ (VMS) वापरणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. परंतु, या जहाजांचा देशांतर्गत मासेमारी ताफ्यातील वाटा केवळ दहा टक्के आहे. इंडोनेशियातील मासेमारी कंपन्यांमध्ये अनुपालन कमी आहे. मंत्रालयाने अधिकृतपणे फक्त सहा हजार मासेमारीच्या परवान्यांची नोंदणी केली आहे; परंतु परिवहन मंत्रालयाने सुमारे परवानगी असलेल्या २३ हजार जहाजांची नोंद केली आहे. या यंत्रणेने बेकायदेशीर मासेमारीला चाप बसेल, अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच समुद्रीसंपत्तीच्या संवर्धनाचा मार्गही प्रशस्त होईल.



उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास. 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत

मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत 'कलम ४०' चा गैरवापर; वक्फ बोर्डाचे धक्कादायक वास्तव उघडकीस!

लोकसभेत १२ तासांबून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक पास झाले. दरम्यान विधेयकाच्या बाजूने एकूण २८८ मते पडली, तर विरोधात २३२ मते पडली आहेत. वास्तविक हे विधेयक वक्फ मालमत्तेच्या पारदर्शकतेबाबत आहे, मात्र विरोधक याला धार्मिक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर वक्फ विधेयकात सुधारणा करणे आवश्यक होते. कारण त्यातील 'कलम ४०' त्याला कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्याची सूट देत होते. अशातून वक्फने शेतकऱ्यांच्या जमिनीच नाही तर मंदिरे आणि चर्चवरही आपला दावा मांडला होता. Waqf Board misuse of ..

वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

Waqf Amendment Bill २ एप्रिल २०२५ रोजी संसदेत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केले आहे. यावेळी त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि गरीब निराधार महिलांसाठी हा कायदा महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. एवढेच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी वक्फची एकूण माहिती दिली. त्यावेळी अनेक विरोधकांनी याला विरोध केला. मात्र, त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना त्याचा फायदा होईल असेही ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121