"राजकारण हा माझा प्रांत", लोकसभा निवडणुकीतून राजकारणात येण्याबद्दल नाना स्पष्टच बोलले

    11-Mar-2024
Total Views |
अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
 

nana patekar 
 
मुंबई : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आज नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मकरंद अनासपुरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुष्काळ हटवण्यासाठी सरकार प्रयत्न करेलच मात्र आम्हीही नाम फाऊंडेशन म्हणून शक्य तितके सगळे प्रयत्न करु असं मकरंद अनासपुरे यांनी म्हटलं आहे. यानंतर नाना पाटेकरांना (Nana Patekar) विचारणा करण्यात आली की तुम्ही शिरुरमधून निवडणूक लढवणार का? त्यावर आता त्यांनी उत्तर दिलं आहे.
 
मला सगळ्याच राजकीय पक्षांकडून ऑफर मिळाली असल्याचे मोठं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी केले. मला ऑफर असली तरी मी ही ऑफर स्वीकारणार नसून राजकारण हा आपला प्रांत नसल्याचे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले.मागील दिवसांपासून नाना पाटेकर निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना नाना पाटेकर यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर नाना पाटेकर राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली.
 
हे वाचलंत का? - जे. जे. महाविद्यालयाच्या जुन्या आठवणीत रमणारे नाना पाटेकर
 
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना नाना पाटेकर यांना लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना नाना पाटेकर म्हणाले की, निवडणुकीबाबत म्हणाल तर मला ज्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे, त्याचं नाव कळलं तर मी तिथं जाऊन प्रचार करायला सुरुवात करेन. मला निवडणूक लढवण्यासाठी सगळ्यांकडून ऑफर आहे. पण समस्या अशी आहे की, मला ते जमणार नाही. राजकारणात गेल्यावर जपून बोलावं लागलं मात्र मला जपून बोलता येणार नाही, असे नानांनी सांगितले.
 
 
 
 
पुढे म्हणाले की, सत्तेत गेल्यावर अधिक चांगलं काम करता येईल, असं तुम्हाला वाटतं का. आज सत्तेत आपली सगळीच मंडळी आहे. विरोधी पक्षातही आहेत. सगळ्यांना हात जोडणं हे आपल्याला जमतं. पण जनतेकडे हात जोडून मला मतं द्या, असं मी कधीही म्हणणार नाही. नुसता मी उभा आहे म्हटल्यावर लोकांनी निवडून दिलं पाहिजे, इतकं तुमचं काम चांगलं असलं पाहिजे, असेही नाना पाटेकर यांनी सांगितले.