मुंबई : होळी सणानिमित्ताने कोकण रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सज्ज झाली आहे. तसेच, मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष ट्रेन्स चालविण्यात येणार आहे. दरम्यान, आता पश्चिम रेल्वेही होळीनिमित्ताने आपल्या प्रवाशांकरिता सज्ज झाली आहे. पश्चिम रेल्वेकडून होळी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत पश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे-भगत की कोठी, सुरत-सुभेदारगंज आणि ओखा-दिल्ली सराय रोहिल्ला दरम्यान प्रवाशांसाठी विशेष शुल्कासह विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
या सर्व गाडी क्र.०९०३५, ०९११७ आणि ०९५२३ चे बुकिंग सोमवार, दि.११ मार्च २०२४ पासून सर्व प्रवासी आरक्षण केंद्र आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, अधिक तपशीलवार माहितीसाठी रेल्वेच्या https://wr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गाड्यांचे तपशील : सुटण्याची तारीख : सुटण्याची वेळ
- 09035 वांद्रे टर्मिनस-भगत की कोठी : बुधवार, दि. 20 आणि 27 मार्च : सकाळी 11
- 09036 भगत की कोठी-वांद्रे टर्मिनस : गुरुवार, दि. 21 आणि 28 मार्च : दुपारी 3.30
- 09117 सुरत-सुभेदारगंज : शुक्रवार, दि. 22 व 29 मार्च आणि 5 व 12 एप्रिल : सकाळी 6
- 09118 सुभेदारगंज-सुरत : शनिवार, दि. 23 व 30 मार्च आणि 6 व 13 एप्रिल : सायंकाळी 7.25
- 09523 ओखा-दिल्ली सराय रोहिल्ला : मंगळवार, दि. 19 मार्च : सकाळी 10
- 09524 दिल्ली सराय रोहिल्ला-ओखा : बुधवार, दि. 20 मार्च : दुपारी 1.20