राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांचा आरोप
01-Mar-2024
Total Views | 96
जातीवाद पसरवण्यासाठी रोहीत पवार पैसे पुरवतात असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांनी रोहीत पवारांनी (rohit pawar yogesh sawant) असे अनेक कार्यकर्ते कामाला ठेवले आहेत असही ते म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी रोहीत पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रोहीत पवार यांनी ट्रोल आर्मी बनवली आहे ज्यांना जातीवाद पसरवण्यासाठी ते पैसे पुरवतात असा आरोप त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राम्हण समाजाविरोधी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा विडीयो शेअर केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. त्यावर उमेश पाटील बोलत होते.
''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राम्हण समाजाविरोधी आक्षेपार्ह विडीओ शेअर करणारा योगेश सावंत हा रोहीत पवार यांचा कार्यकर्ता आहे. अशा पोस्ट शेअर करण्यासाठी रोहीत पवारांनी पगारी लोक ठेवले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी रोहीत पवारांनी असे अनेक कार्यकर्ते कामाला ठेवले आहेत.'' असे ते म्हणाले.
हे लोक काही डमी अकाउंट चालवतात काही स्वत:चे अकाउंट चालवतात आणि अतिशय आक्षेपार्ह पोस्टस् आणि कमेंटस् ते यामार्फत करत असतात. असही उमेश पाटील यावेळी म्हणाले. सोशल मिडीया उपलब्ध आहे म्हणुन त्यावर काहीही वक्तव्ये करणे हे योग्य नाही असही ते यावेळी म्हणाले.
रोहीत पवारांना राजकारणात लवकर मोठं व्हायच आहे. अजित पवारांना राजकारणात या उंचीवर पोहोचण्यासाठी ३५ वर्षाची मेहनत लागली परंतु रोहीत पवार ३ ४ वर्षांतच राज्याचे मुख्यमंत्री होउ पाहात आहेत. राष्ट्रवादी पक्ष कसा आपल्या ताब्यात येइल असा ते प्रयत्न करत असतात. त्यांच्या या महत्वाकांक्षेमुळेच ते अशा प्रकारे लोकांना पैसे देवुन अशांतता पसरवत आहेत. असही पुढे उमेश पाटील यांनी म्हटल आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी देवेंद्र फडणवीसांसह ब्राम्हण समाजला संपवुन टाकु अस म्हणणाऱ्या एका युवकाचा विडीयो सोशल मिडीयावर वायरल झाला होता. हा विडीयो शेअर करणाऱ्या योगेश सावंत या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पदाधिकारी असल्याचं समोर आलं होत. या योगेश सावंतला सोडवण्यसाठी स्वत: रोहीत पवारांनी पोलीसांना फोन केला असल्याची माहीतीही आमदार आशिष शेलार यांनी विधीमंडळ अधिवेशनात बोलताना दिली होती.