तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून जम्पिंग स्पायडरच्या नव्या प्रजातीचा शोध, संशोधन अहवाल आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित..
मुंबई (विशेष प्रतिनिधी): तामिळनाडूतील कन्याकुमारी जिलह्यातुन जम्पिंग स्पायडरच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. इंडोपॅडिला कन्याकुमारी असे या नव्या प्रजातीचे नाव असून अरॅक्नोलॉजी या ब्रिटीश जर्नलमध्ये हा संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
गौतम कदम, ऋशीकेश त्रिपाठी आणि अंबालापरंबील सुधीकूमार या संशोधकांनी ही प्रजात तमिळनाडूतुन शोधली आहे. इंडोपॅडिला हे या प्रजातीच्या वर्गाचे नाव आहे. तर, तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधून ही प्रजात संशोधकांना २०१९ मध्ये मिळाली. कन्याकुमारीमध्ये आढळल्यामुळे या प्रजातीचे नामकरण इंडोपॅडिला कन्याकुमारी असे ठेवण्यात आले आहे. बांबूच्या स्थानीक प्रजातींवर सापडणारी ही प्रजात कन्याकुमारी वन्यजीव अभयारण्य मध्ये उंच पर्वतीय सदाहरीत डोंगर रांगात आढळुन येते.
विशेष म्हणजे, या संशोधनातील इंडोपॅलिडा कन्याकुमारी या नव्याने शोध लागलेल्या प्रजातीचा फोटो जर्नलच्या मुखपृष्ठावर छापण्यात आला आहे. त्याचबरोबर, या संशोधन अहवालामध्ये इंडोपॅडिला दारजिलिंग या प्रजातीचा मेघालय राज्यातील विस्तरावर सविस्तर मांडणी केली आहे.
"कोळयाच्या प्रजाती ह्या प्रामुख्याने अभासाच्या दृषटिकोनातूनच दुर्लक्षित असतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यात कोळी महत्त्वाची भूमिका बजावतात. भक्षक म्हणून, ते कीटक आणि इतर आर्थ्रोपॉड्सच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात, रोगाचा प्रसार आणि पिकांचे नुकसान कमी करतात. त्यांचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता भारतात त्यांच्या संवर्धन तसेच संशोधन व्हावे या साठी आम्ही प्रयत्न करीत आहोत."
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.