काँग्रेस नेत्याने पत्रकाराला केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल!
01-Mar-2024
Total Views | 43
भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये काँग्रेस नेत्याने पत्रकाराच्या घरात घुसून मारहाण केली. तो आपल्या समर्थकांसह पत्रकाराच्या घरात घुसला, त्यावेळी हातात बंदूक घेऊन घरात घुसून पत्रकाराला बेदम मारहाण केली. यावेळी त्याने घरातील महिलांशीही गैरवर्तन केले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. त्याचबरोबर हा गुन्हा करणाऱ्या काँग्रेस नेत्याचे नाव अन्वर कादरी असल्याचे बोलले जात आहे. ते इंदूरच्या वॉर्ड क्रमांक ५७ चे नगरसेवक आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण सदर बाजारच्या बडवली चौकी भागातील आहे. जिथे बुधवारी, दि. २८ फेब्रुवारी २०२४ काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरी यांनी जावेद नावाच्या व्यक्तीच्या घरात घुसून बेदम मारहाण केली. तो दिवसाढवळ्या हातात बंदूक घेऊन जावेदच्या घरात घुसला आणि त्याने जावेदवर हल्ला केला. अन्वरसोबत झुबेर, मोगली आशिक आणि त्याचा मेहुणा अस्लम अमजद आणि इतर काही जण होते.
संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यात अन्वर आणि त्याचे साथीदार हातात शस्त्रे घेऊन जावेदच्या घराकडे जाताना दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. वृत्तानुसार, अन्वर कादरी पत्रकाराने आपल्या विरोधात बातम्या लिहिल्याबद्दल संतापले आणि त्याला धडा शिकवण्यासाठी मारहाण केली.
जावेद खान यांनी आरोप केला की, काँग्रेसचे नगरसेवक अन्वर कादरी त्यांच्याबद्दल काही बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे संतापले होते. दरम्यान, जावेदने माहितीच्या अधिकारातून (आरटीआय) त्याच्याशी संबंधित काही माहिती मागितली होती, त्यामुळे संतप्त होऊन त्याने हल्ला केला. या प्रकरणाबाबत इंदूरचे एसीपी विवेक सिंह चौहान यांनी सांगितले की, जावेदच्या लेखी तक्रारीवरून अन्वर कादरी आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४५२ अंतर्गत (जबरदस्तीने घरात घुसून दुखापत करणे, मारहाण करणे किंवा चुकीचे काम करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणावर माहिती देताना चौहान म्हणाले की, कादरी यांनी फोनवर धमकावल्याबद्दल खानविरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात एफआयआरही दाखल केला आहे. फोन केल्यानंतरच हा वाद सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अन्वर कादरी यांनी सांगितले की, परवाना असलेले शस्त्र 'स्वतःच्या सुरक्षेसाठी' सोबत घेतले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमधून त्याचे सर्व गैरकृत्य समोर आले आहे.