राज ठाकरेंनी केली दोन बड्या नेत्यांची हकालपट्टी! नेमकं घडलं काय?
08-Feb-2024
Total Views | 320
सिंधुदुर्ग : राज्यात लवकरच निवडणुकांचा मुहुर्त निघणार असून अनेक राजकीय पक्षांमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस बघायला मिळत आहे. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंधुदुर्गतील दोन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज असे या दोन पदाधिकाऱ्यांची नावं आहेत.
महत्त्वाची सूचना... सन्मा. राजसाहेबांच्या आदेशाने श्री. परशुराम उपरकर आणि श्री. प्रवीण मर्गज ह्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कोणताही संबंध असणार नाही, ह्याची तमाम महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी. #प्रसिद्धीपत्रक#PressReleasepic.twitter.com/rBrbkcZiNI
मनसे नेते शिरीष सावंत यांनी याबाबत एक पत्रकही जारी केले आहे. "राजसाहेबांच्या आदेशाने परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज ह्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कोणताही संबंध असणार नाही, ह्याची तमाम महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी," असे या पत्रकात म्हटले आहे.
परशुराम उपरकर हे मनसेचे सरचिटणीस होते. मागील काळात झालेल्या राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच गेल्या एक वर्षापासून परशुराम उपरकर हे पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी झाले नाही. त्यामुळे गुरुवारी परशुराम उपरकर आणि प्रविण मर्गज यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.