पालघरची कृषी संस्कृती जपण्यासाठी बियाणे महोत्सवाचे आयोजन

    07-Feb-2024
Total Views | 35

krushi 
 
मुंबई : 'सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर' येथे बियाणे महोत्सवाचे (देशी वाण) आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवार, दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात हा महोत्सव संपन्न होणार आहे. एकमेकां बीज देऊ ही धरा जिवंत ठेऊ... हे ब्रीद हाती घेऊन देशी वाणांची बियाणी टिकावीत, त्यांची देवाण-घेवाण व्हावी, बियाणांचे संवर्धन व्हावे आणि त्यांचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने हा महोत्सव संपन्न होत आहे.
 
यावेळी पालघर जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार आणि देशी बियाणे संवर्धक आपल्या जवळ असलेली वेगवेगळी देशी बियाणी प्रदर्शनात मांडतील. त्यांची खरेदी विक्री होईल. त्यासाठी महाविद्यालयातर्फे मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे.
फुलझाडे, पालेभाज्या, फळभाज्या, फळबिया, रानभाज्या, तृणधान्ये, कंद, औषधी वनस्पती आणि इतर अन्नधान्याचे देशी वाण यांची बियाणी महाविद्यालयातील प्रदर्शनात मांडण्यासाठी शेतकरी घेऊन येणार आहेत. नवधारी भेंडा, मेणी काकडी, देठाचे बी, गुजरी वाल, पावटा, लाल पावटा, सफेद पापडी, तुर, सिताफळाच्या बीया, काजु बीया, जांभळाच्या बीया, अळू, काळे तीळ, निमडा, रांजण इ. विविध प्रकारची देशी बियाणी प्रदर्शनात उपलब्ध होतील.
 
आपल्या परिसरात अशा प्रकारची बियाणी कुणी जतन करत असेल तर त्यांना या महोत्सवाची आवर्जून माहिती देऊन प्रोत्साहित करावे आणि बियाणांचे जतन व संवर्धन करण्याच्या या निसर्गपूरक उपक्रमात आपण सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121