शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा; म्हणाल्या, "... बंगल्यात बसून"

    06-Feb-2024
Total Views | 86

Sharmila Thackeray & Uddhav Thackeray


पुणे :
कोरोनाकाळात सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. शर्मिला ठाकरेंनी नाव न घेता महाविकास आघाडी सरकार आणि तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळावर निशाणा साधला.
 
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, "मार्च-एप्रिलपासून निवडणुका सुरु होतील. ऑक्टोबरमध्ये आमदारकी असेल आणि पुढच्या वर्षी महापालिका लागतील. पण तरीसुद्धा आमची कामं थांबत नाहीत. आम्ही निवडून येवो किंवा न येवो, आमच्या पक्षाचे काम सुरु असते. कोरोनाकाळात आपल्या पक्षाने जेवढी कामं केली तेवढी कोणत्याही पक्षाने केली नव्हती. त्यावेळी तर सगळे सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते आणि आपला पक्ष रस्त्यावर होता. आमची अनेक चांगली चांगली मुलं कोविडमध्ये दगावली."
 
पुढे त्या म्हणाल्या की, "आपल्या पक्षाचे इतके चांगले उमेदवार होते पण लोकांनी चुक केली. पण मला खात्री आहे की, तुम्ही यावेळी अशी चुक करणार नाही. चांगले कामं करणारे उमेदवार मला वरच्या घरात बघायचे आहेत," असेही त्या म्हणाल्या आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121