हिंदूविरोधी वक्तव्य भोवलं! मौलाना अजहरीवर एटीएसची कारवाई

    05-Feb-2024
Total Views | 636
 Maulana Azhari
 
मुंबई : हिंदू धर्माविरोध वादग्रस्त वक्तव्य करणारे मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. अझहरीवर भाषणातून द्वेष पसरवल्याचा आरोप आहे. एटीएसने अझहरीला मुंबईतील घाटकोपर येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलानाविरुद्ध कलम १५३ (ए), ५०५ यासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अटकेनंतर मौलानाला दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर पाठवण्यात आले आहे. गुजरात एटीएस मौलानाला जुनागडला घेऊन जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मौलानाच्या अटकेनंतर कोणत्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस सज्ज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
मौलानांच्या वकिलांनी पोलिसांच्या कारवाई बेकायदेशिर असल्याचे म्हटले आहे. मौलाना अझहरीवर गुजरातमधील जुनागढ येथे एका कार्यक्रमात बोलताना, हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121