ऑक्टोबर - डिसेंबर २०२३ तिमाहीत भारताचा विकासदर ८.४ टक्के - नॅशनल स्टॅटिस्टिकस ऑफिस

एनएसओ (नॅशनल स्टॅटिस्टिकस ऑफिस) ने दिलेल्या माहितीतील निष्कर्ष

    29-Feb-2024
Total Views | 40

GDP
 
 
मुंबई: भारताची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्क्याने वाढली असल्याची माहिती एनएसओ (नॅशनल स्टॅटिस्टिकस ऑफिस) ने दिली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ही वाढ ७ टक्क्यांपर्यंत इतकी राहिली होती. आता उत्पादन, खाणी, बांधकाम क्षेत्रातील चांगल्या वाढीमुळे एकूण विकासदर वाढला आहे. ऑक्टोबर- डिसेंबर तिमाहीत ८.४ टक्क्याने वाढ झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याशिवाय चालू दरवाढीत ७.३ टक्के विकासदर राहिल असे अनुमान आपल्या आकडेवारीत केलेले आहे.
 
याआधी २१-२२ मध्ये एनएसओने विकासदर ७.२ टक्के राहील असे सुतोवाच केले होते.प्रत्यक्षात ही २३-२४ मधील दरवाढ ७ टक्के राहिली होती. बाजारातील निर्देशांकात सांगितलेल्या माहितीत, प्रमुख ८ क्षेत्रातील कोळसा, सिमेंट, नॅचरल गॅस, इलेक्ट्रिसिटी, क्रूड तेल मागील जानेवारी २३ तुलनेत जानेवारी २४ मध्ये ३.६ टक्क्याने वाढ झालेली आढळते.
 
दुसऱ्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रात १३.९ टक्के वाढून शेती, पशुपालन, मासेमारी या क्षेत्रातील विकास दर १.२ % इयर ऑन इयर बेसिसवर याच काळातील मागील वर्षात तो किंचित अधिक (२.५ टक्के) ह़ोता. एसबीआय रिसर्च अहवालानुसार डिसेंबर २४ तिमाहीत विकासदर हा ६.७ ते ६.९ टक्के राहिल असे म्हटले गेले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121