विवेक जैन यांची केप्री ग्लोबलच्या चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसरपदी नियुक्ती

विवेक जैन हे केप्री ग्लोबलमध्ये दाखल होण्यापूर्वी कोटक बँकेमध्ये 15 वर्षांहून अधिक वेळ कार्यरत

    29-Feb-2024
Total Views | 25

Vivek Jain
 
 
मुंबई: केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड ही बँकिंग-एतर वित्तीय कंपनी असून विवेक जैन यांची नवनिर्वाचित चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर (CHRO) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 
स्वत:च्या कौशल्यासोबत केप्री ग्लोबलमध्ये प्रवेश करणारे विवेक जैन त्यांचे धोरणात्मक विचार, सेवाभिमुख दृष्टीकोन आणि व्यवसायाचे नवीन आयाम तयार करण्याच्या क्षमतेसह महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहेत. सर्वोच्च प्रतिभा आकर्षित, विकसित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी तसेच उच्च-कार्यक्षमता, उद्योजकीय संस्कृती निर्माण करण्यासाठी ते वरिष्ठ नेतृत्व संघाला सहयोग करतील. ते एचआर क्षेत्रातील एक प्रतिष्ठित तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे 25 वर्षांपेक्षा जास्त उद्योग कौशल्य आणि प्रतिभा व्यवस्थापित करण्याचा दूरदर्शी दृष्टीकोन आहे.
 
केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड’चे मॅनेजिंग डायरेक्टर राजेश शर्मा यांनी या नियुक्तीबाबत आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, "आम्ही विवेक जैन यांचे आमच्या ह्युमन रिसोर्स टीमचे नेतृत्व करण्यासाठी स्वागत करतो. बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील त्यांचा व्यापक अनुभव आमच्या विकासाच्या मार्गाशी सुसंगत आहे, प्रभावी कौशल्यांसह उच्च-स्तरीय प्रतिभा आमच्या यशात योगदान देईल याची सुनिश्चितता देते. कामाच्या सकारात्मक वातावरणाला चालना देणे आणि आमच्या व्यावसायिक उद्दिष्टांच्या अनुषंगाने धोरण विकसीत करण्यात विवेक जैन यांचे कौशल्य महत्त्वाची भूमिका बजावेल. कॅप्री ग्लोबलमध्ये, आम्ही आमच्या लोकांना प्राधान्य देतो आणि त्यांचे मार्गदर्शन हे प्रत्येकाच्या करिअरचे मार्ग तयार करण्यासाठी, त्यांची योग्य वाढ होण्यासाठी आणि उत्कृष्टतेकडे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
 
 
विवेक जैन हे केप्री ग्लोबलमध्ये दाखल होण्यापूर्वी कोटक बँकेमध्ये 15 वर्षांहून अधिक वेळ कार्यरत होते. कोटक बँकेतील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सिनिअर एक्झिक्युटीव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि एचआर हेड फॉर इनव्हेस्टमेंट बँकिंग, इनस्टीटयूशनल इक्विटी, प्रायव्हेट इक्विटी, प्रायव्हेट बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, कॉर्पोरेट ट्रेझरी आणि मालमत्ता पुनर्बांधणी यासारख्या प्रमुख भूमिका पार पाडल्या. या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करत नोकरीत बदल करण्याचे प्रमाण 20% पेक्षा कमी ठेवले, प्रति कर्मचारी महसूल सुधारला आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय पद्धती सादर करण्यावर भर दिला. कोटकमधील कार्यकाळापूर्वी विवेक यांनी जेनपॅक्ट आणि ल्युपिन फार्मास्युटिकल्ससारख्या संस्थांमध्ये काम पाहिले आहे.
 
विवेक जैन यांनी दिल्लीच्या इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून एमबीएमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे आणि सध्या ते ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट या विषयात डॉक्टरेट करत आहेत. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑर्गनायझेशनल अॅनालिसिसमध्ये प्रकाशित झालेल्या करियर प्रोग्रेशनवरील त्यांच्या संशोधनपर प्रबंधातून त्यांची विद्वत्तापूर्ण शक्ती स्पष्ट होते. याव्यतिरिक्त, विवेक हे PCC – ICF प्रमाणित प्रशिक्षक आहेत. विवेक हे स्वत: 2019 पासून स्किल डेव्हलपमेंट अँड लाईव्हलीहूडवरील CII नॅशनल कमिटीचे सदस्य देखील आहेत. ते विनाअडथळा व्यावहारिक उद्योगाच्या अनुभवासह शैक्षणिक कौशल्याचा मेळ घालतात. त्यांच्या केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडमधील नियुक्तीमुळे आमच्या कर्मचारी बळात एक मौल्यवान भर पडली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत

मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत 'कलम ४०' चा गैरवापर; वक्फ बोर्डाचे धक्कादायक वास्तव उघडकीस!

लोकसभेत १२ तासांबून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक पास झाले. दरम्यान विधेयकाच्या बाजूने एकूण २८८ मते पडली, तर विरोधात २३२ मते पडली आहेत. वास्तविक हे विधेयक वक्फ मालमत्तेच्या पारदर्शकतेबाबत आहे, मात्र विरोधक याला धार्मिक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर वक्फ विधेयकात सुधारणा करणे आवश्यक होते. कारण त्यातील 'कलम ४०' त्याला कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्याची सूट देत होते. अशातून वक्फने शेतकऱ्यांच्या जमिनीच नाही तर मंदिरे आणि चर्चवरही आपला दावा मांडला होता. Waqf Board misuse of ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121