नवी दिल्ली : 'रिलायन्स इंडस्ट्रीज'चे प्रमुख मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहासोहळ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. अनंत अंबानी यांचा विवाहपूर्व सोहळा ज्याठिकाणी पार पडला आहे त्याठिकाणी अंबानी कुटुंबीयांकडून मंदिरांची उभारणी केली गेली आहे. अंबानी कुटुंबीयांनी गुजरातमधील जामनगरमध्ये तब्बल १४ मंदिरे बांधली आहेत.
दरम्यान, यासर्व १४ मंदिरांत देवदेवतांच्या सुंदर कोरीव मूर्ती बसविण्यात येणार आहेत. तसेच, या मंदिरांच्या निर्माणानंतर नुकतेच मुकेश अंबानी व नीता अंबानी यांनीही या मंदिराला भेट दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानी यांच्या लग्नापूर्वी कुटुबीयांनी जामनगरमधील मोती खावाडी येथे एका मंदिर संकुलात १४ मंदिरे बांधली आहेत. तसेच, या सर्व मंदिरात भित्तीचित्र शैलीत कोरीव काम असणार आहे.
१४ मंदिरात कोरीव काम केलेल्या देव-देवतांच्या सुंदर मूर्त्या बसविण्यात येणार आहे. या सर्वांत विशेष म्हणजे लोप पावत चाललेली भाटीगल संस्कृतीचा विचार करून मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिरांच्या माध्यमातून वास्तुकला आणि आध्यात्मिक ओळख पिढ्यानपिढ्या चालत आलेला कलात्मक वारसा इथे पाहायला मिळतो.
रिलायन्स फाऊंडेशनच्या अधिकृत X हँडलवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची शुभ सुरुवात म्हटले आहे. तसेच, फाउंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांनी या मंदिराला भेट दिली आहे. मंदिर परिसरातील भेटीदरम्यान येथील भाविक, कारागीरांशी चर्चा केली.
संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी या मंदिराला भेट दिली, ज्याचा एक व्हिडिओ रिलायन्स फाउंडेशनच्या अधिकृत X हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसह पोस्टमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची शुभ सुरुवात म्हटले आहे. या मंदिर बांधकाम करणाऱ्या कारागीरांनादेखील एका अतिशय शुभ मुहूर्तावर बोलावण्यात आले आहे, जणू ते स्वतः या लग्नाचा एक भाग आहेत, असा संदेशही या व्हिडीओत पाहायला मिळतो आहे.