नवी दिल्ली : तामिळनाडू सरकारने इस्त्रोच्या जाहिरातीत चिनी रॉकेटचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचा दौरा करत यासर्वप्रकारावर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान म्हणाले, हा सर्वप्रकार म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांचा अपमान असून द्रमुकने माफी मागावी, असे ते म्हणाले. तसेच, हा तामिळनाडूच्या करदात्यांचा अपमान असल्याचेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
दरम्यान, तामिळनाडू दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी 'कुशलशेखरपट्टीनम' येथे इस्रोच्या नवीन प्रक्षेपण संकुलाची पायाभरणी केली. मोदी म्हणाले की, आतापर्यंत लोक फक्त त्यांच्या योजना चोरून त्यावर स्वतःचा शिक्का मारत असत आणि आता त्यांनी त्यावर चीनचे स्टिकर लावायला सुरुवात केली आहे, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्याआधी द्रमुक सरकारने स्थानिक वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रमुकवर निशाणा साधला. सदर जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन आणि पंतप्रधान मोदी यांच्या फोटोंच्या मागे एक रॉकेट दिसत आहे ज्यावर चीनचा ध्वज दिसत आहे. या जाहिरातीचे चित्र समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक स्टॅलिन सरकारच्या कृतीचा निषेध करत आहेत आणि काही विनोद करत आहेत.