मुंबई: आरबीआयच्या माहितीनुसार चलन अभिसरणात (सरक्युलेशन) घट झाली आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत ही चलनाची घट ८.२ टक्क्यांवरून ३.७ टक्क्याने झाली आहे. गेल्या वर्षी चलन अभिसरणतील ही घट गेल्या वर्षी आरबीआयच्या २००० रुपयांच्या नोटा परत घेतल्यामुळे झाली असल्याचा आरबीआयच्या निष्कर्षात स्पष्ट झाला आहे. करन्सी इन सरक्यूलेशन (सीआयसी ) म्हणजे बाजारात उपलब्ध असलेला चलनाचा पुरवठा होय. व चलन म्हणजे बाजारातील पुरवठा वजा आरबीआयकडे असणारे चलन असते.
आरबीआयच्या माहितीनुसार, 'रिझर्व्ह मनी' (उरलेले वित्त) यामध्ये फेब्रुवारी ९ २०२४ पासून ५.८ टक्क्याने अभिसरण घटले आहे. गेल्या वर्षी हे अभिसरण हे ११.२ टक्क्याने घटले होते. रिझर्व्ह मनीमध्ये व्यवसायिक बँकेच्या आरबीआयमधील मुदतठेवी, इतर मुदतठेवी यांचा अंतर्भाव असतो. १९ में २०२३ मध्ये आरबीआयकडून २००० चलन परत घेण्याचा निर्णय घेतला गेला.
आरबीआयच्या माहितीनुसार,३१ जानेवारीपर्यंत २००० च्या ९७.५ टक्के नोटा आरबीआयकडे परत आल्या होत्या. परत मागवण्यात आलेल्या दिवसापूर्वी २००० रूपयांच्या ३.५६ लाख कोटी नोटा बाजारात उपलब्ध होत्या.
२००० रुपयांच्या नोटा नोव्हेंबर २०१६ मध्ये घोषित केल्या गेल्या. ५००, १००० रूपयांच्या नोटबंदीनंतर २००० रूपयांच्या नोटा छापण्याचा निर्णय आरबीआयकडून घेण्यात आला होता.