नवी दिल्ली : गुजरातमध्ये हिंदूंच्या विरोधात विष पसरवणाऱ्या मुफ्ती सलमान अझरी यांना असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दिला आहे. दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे झालेल्या एका सभेत जलील यांनी मुफ्ती अझरी यांच्या भाषणाने संतप्त झालेले लोक स्वतःला 'कुत्रे' का समजतात, असा सवाल केला. 'आज कुत्तों का वक्त है, कल हमारा दौर आएगा' ह्या अझरी यांच्या विधानाला त्यांनी केवळ एक शेर असल्याचे सांगितले.
अकोल्याच्या सभेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये इम्तियाज जलील म्हणत आहेत, “ते (मुफ्ती अजहरी) म्हणाले की आज कुत्तों का वक्त है, कल हमारा दौर आएगा. तेव्हा ते मौलाना साहेबांना घेऊन (अटक करून) निघून गेले. पण तुम्ही स्वत:ला कुत्रे का समजता? आम्ही तुमचे कोणते नाव सांगितले? पण रात्री घरी गेल्यावर सगळ्यांनी भुंकायला सुरुवात केली.यादरम्यान सभेत उपस्थित लोक नारेबाजी करत इम्तियाज जलील यांना पाठिंबा देताना दिसले. या आक्षेपार्ह विधानावर मंचावर उपस्थित काही लोक हसतानाही दिसले.
दि.४ फेब्रुवारीला गुजरात पोलिसांनी मुफ्ती सलमान अझरी यांना जुनागडमध्ये ३१ जानेवारी २०२४ रोजी हिंदूंविरोधात भडकाऊ भाषण दिल्याबद्दल अटक केली होती. जुनागड न्यायालयाजवळील नारायण विद्या मंदिर मैदानात हे आक्षेपार्ह विधान करण्यात आले. यावेळी शेकडो मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. तेव्हा मुफ्ती सलमान अजहरी म्हणाले होते, “करबलाची शेवटची लढाई अजून बाकी आहे. काही वेळ शांतता आहे, मग किनारा येईल. आज कुत्र्यांची वेळ आहे, उद्या आमची वेळ येईल.
शेवटी त्यांनी जोरात 'लब्बैक या रसूलल्लाह'चा नारा दिला. मैदानात उपस्थित असलेल्या जमावाने त्यांच्या समर्थनार्थ 'गुलाम है, गुलाम है, रसूल के गुलाम है' अशा घोषणाही दिल्या. मुफ्ती सलमान अजहरी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सध्या सलमान अझहरीविरुद्ध ‘पासा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. मात्र, सलमान अझरीने पहिल्यांदा असे केले नाही. या विधानापूर्वीही त्यांची अनेक वादग्रस्त भाषणे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात 'चोर, f#@%... बाबांची शक्ती कमी आहे' अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे.