काम की बात: लवकरच ' बेनामी' कॉलचा त्रास बंद होणार ग्राहकांसाठी काय नवीन सुविधा जाणून घ्या….

ट्रायने बेनामी फोन करणाऱ्या व्यक्तींचे नाव मोबाईलवर यावे यासाठी कंपन्याना केल्या सुचना

    24-Feb-2024
Total Views | 132

Unknown Calls
 
 
मुंबई: टीआरएआयने आज महत्वाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. हे परिपत्रक टेलिकॉम कंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्वे घोषित केली आहेत. ' बेनामी ' नंबरवरून फोन कमी व्हावेत या उद्देशाने टेलिकॉम कंपन्यांना कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोबाईलवर दर्शवण्यासाठी मार्गदर्शक सुचना करण्यात आल्या आहेत.
 
'इंट्रोडक्शन ऑफ कॉल नेम प्रेझेंटेशन ' या अहवालातील शिफारसीनुसार या सेवेचे अवलंबन करण्यासाठी टीआरएआय (टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया)ने कंपन्यांना ट्रायने सुचना केली आहे. टीआरएआयने नव्या मसुद्यासाठी जनतेच्या सूचना मागवल्या होत्या. यातील आलेल्या मागण्या व टीआरएआयने केलेला अभ्यास या संयुक्तरित्या कार्यवाहीत हा मसूदा तयार करण्यात आला.
 
यातील महत्वाचे मुद्दे -
 
१) कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNAP) अंतर्गत अनोळखी नंबरवरून फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोबाईलवर दर्शविले जावे यासाठी टेलिकॉम कंपन्यांना आवाहन
 
२) कॉलिंग लाईन आयडींटीफिकेशन (सीएसआय) अंतर्गत फोनवर नाव दर्शविले जाण्यासोबत नोंदणीकृत क्रमांकावरील आयपी एड्रेस, नाव, नंबर, पत्ता हेही वेळोवेळी कामकाजात अपडेट करणे.
 
३) ग्राहकांच्या विनंतीने टेलिकॉम कंपन्यांनी ही अपेक्षित सेवा पुरवणे.
 
४) CNAP ची अंमलबजावणी करणारे टेक्निकल मॉडेलची रूपरेषा आखणे.
 
५) ही मार्गदर्शक तत्वे लागू झाल्यानंतर संबंधित सरकारने भारतातील सगळया फोन डिव्हाईसमध्ये या सेवेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे.
 
६) ज्या व्यक्तीकडे अनेक टेलिफोन कनेक्शन नावावर असल्यास कस्टमर एप्लिकेशन्स फॉर्ममध्ये त्या व्यक्तीला ' नाव निवडण्याची ' सुविधा प्रदान करणे
 
७) मल्टिपल टेलिफोन कनेक्शन असणारी व्यक्ती, संस्था किंवा ट्रेडमार्कने कनेक्शन जीएसटी काउन्सिल, सरकार यांच्याबरोबर केलेल्या नोंदणीची संबंधितांनी खातरजमा करणे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121